Lokmat Sakhi >Food > पालकाची भाजी, पराठे करुन कंटाळा आला? १० मिनीटांत करा ढाबा स्टाईल डाळ पालक, झटपट होणारी चविष्ट-हेल्दी रेसिपी...

पालकाची भाजी, पराठे करुन कंटाळा आला? १० मिनीटांत करा ढाबा स्टाईल डाळ पालक, झटपट होणारी चविष्ट-हेल्दी रेसिपी...

Easy and Healthy Dal Palak Recipe : पचन क्रिया सुरळीत होण्यापासून ते हाडं आणि स्नायू मजबूत होण्यापर्यंत डाळ पालक एकत्र खाण्याचे फायदे होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 11:53 AM2023-10-22T11:53:26+5:302023-10-22T11:55:36+5:30

Easy and Healthy Dal Palak Recipe : पचन क्रिया सुरळीत होण्यापासून ते हाडं आणि स्नायू मजबूत होण्यापर्यंत डाळ पालक एकत्र खाण्याचे फायदे होतात.

Easy and Healthy Dal Palak Recipe : Tired of making spinach Sabji and parathas? Make Dhaba Style Dal Palak in 10 minutes, a quick tasty-healthy recipe… | पालकाची भाजी, पराठे करुन कंटाळा आला? १० मिनीटांत करा ढाबा स्टाईल डाळ पालक, झटपट होणारी चविष्ट-हेल्दी रेसिपी...

पालकाची भाजी, पराठे करुन कंटाळा आला? १० मिनीटांत करा ढाबा स्टाईल डाळ पालक, झटपट होणारी चविष्ट-हेल्दी रेसिपी...

पालक आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात पालकाचा समावेश असायला हवा असं आपण नेहमी ऐकतो. पालकामध्ये कॅल्शियम, सोडियाम, कलोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज प्रोटीन, आयर्न, विटामीन सी, विटामीन ए भरपूर प्रमाणामध्ये आढळते. त्यामुळे आपण पालकाच्या भाजीचे भाजी सोडून पालक पुऱ्या, पराठे, पालक पनीर, पालक वड्या असे बरेच वेगवेगळे प्रकार करतो. पण वेळ कमी असेल आणि झटपट चविष्ट काहीतरी खायचे असेल तर याच पालकापासून आपण डाळ-पालकही करु शकतो. डाळ पालक करायला सोपा, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि चवीलाही तितकाच छान लागणारा पदार्थ. पालेभाज्या आणि डाळ एकत्र खाल्ल्याने होणारे फायदे डाळ आणि पालेभाज्या वेगवेगळ्या खाण्याच्या तुलनेत अधिक आहेत. डाळ-पालक खाल्ल्याने प्रथिनं, लोह आणि कॅल्शियम ही महत्वाची खनिजं मिळतात. पचन क्रिया सुरळीत होण्यापासून ते हाडं आणि स्नायू मजबूत होण्यापर्यंत डाळ पालक एकत्र खाण्याचे फायदे होतात. आता ही डाळ पालक कशी करायची पाहूया (Easy and Healthy Dal Palak Recipe)...

साहित्य -

१.  तूर डाळ - पाव वाटी

२. मसूर डाळ - पाव वाटी 

३. मूग डाळ - पाव वाटी 

४. हळद - अर्धा चमचा 

५. तेल - अर्धा चमचा (डाळ शिजण्यासाठी)

६. कांदा - १ बारीक चिरलेला

७. आलं-लसूण पेस्ट - १ चमचा 

८. तेल - २ चमचे (फोडणीसाठी)

९. टोमॅटो प्युरी - एका टॉमेटॉची

१०. धणे-जीरे पावडर - १ चमचा 

११. तिखट - अर्धा चमचा 

(Image : Google )
(Image : Google )

 

१२. गरम मसाला - अर्धा चमचा

१३. पालक - बारीक चिरलेला - २ वाट्या 

१४. मीठ - चवीनुसार

तडकासाठी - 

१. तूप - २ चमचे 

२. जीरे - अर्धा चमचा 

३. हिंग - पाव चमचा 

४. लसणाच्या पाकळ्या - ७ ते ८

५. लाल मिरची - २ ते ३

कृती - 

१. सगळ्यात आधी कुकरमध्ये तिन्ही डाळी स्वच्छ धुवून त्यात थोडी हळद आणि तेल घालून २ कप पाणी घालून शिजायला लावाव्यात.

२. डाळ शिजल्यावर त्यात अंदाजे पाणी घालून ती एकसारखी करुन घ्यावी.

३. पॅनमध्ये तेल घालून त्यात कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी चांगली परतून घ्या. 

४. यामध्ये हळद, धणे-जीरे पावडर, तिखट, गोडा मसाला, मीठ घालून सगळे पुन्हा चांगले परतून घ्या.

५. यामध्ये बारीक चिरलेला पालक घालून २ ते ३ मिनीटे वाफ येण्यासाठी झाकण ठेवा. 

६. यानंतर शिजवलेली डाळ यामध्ये घाला आणि अंदाजे पाणी घालून सगळे एकजीव करुन घ्या. 

७. आता एका लहान कढईमध्ये तेल घालून त्यात जीरे, हिंग, लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरची घालून खमंग फोडणी द्या आणि या डाळीवर ही फोडणी घालून गरमागरम डाळ पोळी किंवा भातासोबत खायला घ्या.

Web Title: Easy and Healthy Dal Palak Recipe : Tired of making spinach Sabji and parathas? Make Dhaba Style Dal Palak in 10 minutes, a quick tasty-healthy recipe…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.