Lokmat Sakhi >Food > भाज्यांतून जास्त पोषण मिळावं तर करा फक्त ५ गोष्टी; मिळेल भरपूर पोषण...

भाज्यांतून जास्त पोषण मिळावं तर करा फक्त ५ गोष्टी; मिळेल भरपूर पोषण...

Easy and important Cooking tips for vegetables : शरीराचे पोषण होण्यासाठी खात असलेल्या भाज्यांतून खरंच तितके पोषण मिळते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2023 12:55 PM2023-11-29T12:55:29+5:302023-11-29T12:56:28+5:30

Easy and important Cooking tips for vegetables : शरीराचे पोषण होण्यासाठी खात असलेल्या भाज्यांतून खरंच तितके पोषण मिळते का?

Easy and important Cooking tips for vegetables : To get more nutrition from vegetables, just do 5 things; Get plenty of nutrition... | भाज्यांतून जास्त पोषण मिळावं तर करा फक्त ५ गोष्टी; मिळेल भरपूर पोषण...

भाज्यांतून जास्त पोषण मिळावं तर करा फक्त ५ गोष्टी; मिळेल भरपूर पोषण...

भाज्यांमधून आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स, खनिजे, फायबर्स अशा विविध गोष्टी मिळतात. त्यामुळे आपण आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करतो. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, सॅलेड, बिया अशा विविध रंगाच्या, चवीच्या भाज्या खातो. शरीराचे चांगले पोषण होण्यासाठी आपल्या दिवसभराच्या आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश असायला हवा असे वारंवार सांगितले जाते. त्याप्रमाणे आपण पोळीसोबत तर भाजी खातोच. पण सूप, दलिया, पुलाव, कटलेट यांच्या माध्यमातूनही आहारात भाज्या घेण्याचा प्रयत्न करतो. पण आपण करत असलेल्या भाज्यांतून जास्तीत जास्त पोषक घटक शरीराला मिळावेत यासाठी भाज्या करताना काही किमान गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. आता या गोष्टी कोणत्या ते समजून घेऊयात (Easy and important Cooking tips for vegetables).

१. बारीक कापू नयेत...

अनेकदा भाजी खायला चांगली लागावी, पोळीच्या घासासोबत घेता यावी म्हणून आपण ती बारीक कापतो. पण अशाने भाजीतील पोषक तत्त्वे कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे भाज्या खूप जास्त बारीक कापू नयेत. तर त्या मध्यम आकाराच्या कापलेल्या केव्हाही जास्त चांगल्या. 

(Image : Google)
(Image : Google)

२. जास्त शिजवू नयेत 

अनेकांना भाज्या कुकरला शिजवून मग त्या फोडणीला टाकण्याची सवय असते. यामुळे वेळ वाचतो आणि गॅसही काही प्रमाणात वाचतो. हे जरी खरे असले तरी भाज्या खूप जास्त शिजवल्या तर त्यातील पोषक घटक मरतात आणि शरीराला म्हणावे तितके पोषण मिळत नाही. म्हणून त्या योग्य त्या प्रमाणातच शिजवलेल्या केव्हाही जास्त चांगल्या. 

३. लहान गॅसवर शिजवा

भाजी झटपट व्हावी म्हणून काही वेळा आपण ती मोठ्या गॅसवर शिजवतो. मात्र तसे करणे योग्य नाही. भाज्या लहान गॅसवर शिजवल्यास चांगल्या शिजल्या जातात आणि चवीलाही चांगल्या लागतात. एकदम गाळ झालेल्या भाजीतून म्हणावे तसे पोषण मिळत नाही. 

४. वाफेवर शिजवा

अनेकदा पातळ भाजी हवी किंवा पटकन मऊ व्हावी म्हणून आपण भाजीत पाणी घालतो. पण यामुळे भाजीची चव आणि पोषण दोन्हीही कमी होते. त्यापेक्षा भाजीवर फक्त झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजवणे केव्हाही जास्त चांगले असते. 

(Image : Google)
(Image : Google)

५. पुन्हा गरम करु नका

आपण एकदा सकाळी भाजी केली की दुपारी जेवणाच्या वेळेला ती पुन्हा गरम करतो. घरातील सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा वेगळ्या असतील तर ही भाजी पुन्हा पुन्हा गरम केली जाते. त्यामुळे भाजीतील पोषण कमी होते. असे होणे आरोग्यासाठी चांगले नसल्याने एकदा केलेली भाजी सतत गरम करु नये. 

Web Title: Easy and important Cooking tips for vegetables : To get more nutrition from vegetables, just do 5 things; Get plenty of nutrition...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.