बेसनाचे लाडू अनेकांना आवडतात (Ladoo Recipe). कोणी रव्याचे तर कोणी बेसनाचे लाडू करतात. घरगुती बेसनाचे लाडू टाळूला चिकटतात. कधी फार तुपकट होतात (Cooking tips). घरात बेसनाचे लाडू तयार करताना बऱ्याचदा फसतात. किंवा कडक होतात. घरात बेसनाचे लाडू करताना फसत असतील तर, या पद्धतीने घरात पौष्टीक लाडू तयार करून पाहा. काही मिनिटात बेसनाचे लाडू तयार होतील(Easy Besan Ke Ladoo Recipe).
बेसन खाण्याचे फायदे
बेसन खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचनक्रिया सुरळीत होईल. ड्रायफ्रुट्समध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आपण बेसन आणि ड्रायफ्रुट्सचे पौष्टीक लाडू तयार करू शकता.
बेसनाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य?
बेसन
साखर
तूप
किसलेलं खोबरं
सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..
मनुका
काजू
वेलची पावडर
पाणी
या पद्धतीने तयार करा पौष्टीक लाडू
- प्रथम कढईत तूप घालून गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात बेसन घालून मंद आचेवर भाजून घ्या. बेसन भाजल्यावर त्यात किसलेले खोबरे, मनुके, चिरलेले काजू आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही
- दुसरीकडे एक भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात साखर आणि पाणी घालून पाक तयार करा. त्यात भाजलेले सर्व साहित्य घालून मिक्स करा.
- साहित्य मिक्स केल्यानंतर हाताला तूप लावून लाडू वळवून घ्या. लाडू हेल्दी तयार करण्यासाठी आपण साखरऐवजी गूळ किंवा खजूरही वापरू शकता. अशाप्रकारे पौष्टीक बेसनाचे खाण्यासाठी रेडी.