उन्हाळ्याच्या दिवसात आहारात दहीचे प्रमाण वाढते. दही आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. दहीचे अनेक पदार्थ केले जातात. ताक, लस्सी, कढी, पराठा, ग्रेवी - भाजी, अशा अनेक पदार्थांमध्ये दह्याचा वापर होतोच. आपण कधी दह्याची चटणी खाल्ली आहे का? नेहमीच्या चटण्या, कोशिंबीर आणि रायतेपेक्षा दह्याची चटणी खाण्यासाठी उत्तम लागते.
दह्याची चटणी पराठा, चपाती, किंवा खिचडीसोबत खायला अप्रतिम लागते. घरातील कमी साहित्यात, कमी वेळात ही रेसिपी झटपट तयार होते. चला तर मग या झटपट चटकदार चटणीची कृती पाहूयात(Easy Curd Chutney | no grinding | side dish for Chapati).
दह्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
फ्रेश घट्ट दही
धणे पावडर
जिरं पावडर
मीठ
कोथिंबीर
नेहमीचा वरणभात-खिचडीचा कंटाळा आला, कुकरमध्ये झटपट करा टोमॅटो राइस, आंबट-तिखट मस्त
मोहरी
जिरं
लसूण
कडीपत्ता
लाल मिरच्या
लाल तिखट
कृती
सर्वप्रथम, फ्रेश घट्ट दही चांगले फेटून घ्या. दही फेटून झाल्यानंतर त्यात धणे पावडर, एक चमचा जिरं पावडर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या.
आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट
दुसरीकडे पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं, बारीक चिरलेला लसूण, ८ - १० कडीपत्त्याची पाने, २ लाल मिरच्या, १ चमचा लाल तिखट घालून मिश्रण मिक्स करा. फोडणी थंड झाल्यानंतर दह्याच्या मिश्रणावर घालून मिक्स करा. अशा प्रकारे दह्याची चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी.