प्रत्येक घरांमध्ये चपाती - भात उरतेच. २ किंवा ३ चपाती उरल्यावर करायचं काय असा प्रश्न पडतो (Food). उरलेल्या चपातीचं आपण चिवडा किंवा त्याची विविध प्रकारचे पदार्थ ट्राय करून पाहतो (Cooking Tips). जर आपल्याला उरलेल्या चपातीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल तर, दही चपाती चाट हा पदार्थ करून खा.
चाटमध्ये आपण शेवपुरी, पाणी पुरी, भेळ पुरी किंवा दही पुरी खातो. आपण याच पद्धतीने दही चपाती चाट करून खाऊ शकता. दही चपाती चाट करायला सोपी आणि झटपट तयार होते. एकदा ही रेसिपी आपण नक्कीच करून खाऊ शकता. दही चपाती चाट कशी बनवायची? पाहूयात(Easy dahi chapati chaat recipe; 10 minute recipe).
दही चपाती चाट करण्यासाठी लागणारं साहित्य
चपाती
दही
साखर
लाल तिखट
कांदा
हिरवी मिरची
पावसाळ्यात कुरमुरे सादळतात? ४ टिप्स; कुरमुऱ्याचा चिवडा करा मस्त कुरकुरीत
हिंग
जिरे पावडर
कसुरी मेथी
कोथिंबीर
लाल तिखट
कोथिंबीर - पुदिन्याची चटणी
कृती
सर्वात आधी गॅसवर चपाती भाजून घ्या. भाजलेल्या चपात्या कडक होईपर्यंत भाजून घ्या. कडक झालेल्या चपात्या एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचा हाताने कुस्करा करा.
आशा भोसले सांगतात त्यांच्या आवडीच्या सोलकढीची रेसिपी, अस्सल चव आणि करायलाही सोपी
एका बाऊलमध्ये फेटलेलं दही घ्या. त्यात दोन चमचे साखर आणि एक कप पाणी घालून मिक्स करा. नंतर त्यात चपातीचा कुस्करा घालून मिक्स करा. मग एक बारीक चिरलेला कांदा, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हिंग, जिरे पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर, लाल तिखट, एक चमचा कोथिंबीर - पुदिन्याची चटणी घालून मिक्स करा.
शेवटी वरून, लाल तिखट आणि हिरवी चटणी पसरवा. अशा प्रकारे दही चपाती चाट खाण्यासाठी रेडी. आपण हा चाट कधीही कोणत्याही वेळी खाऊ शकता.