Join us  

नेहमीचं लिंबू रसबत पिऊन कंटाळा आला? पंकज भदौरीया सांगतात लिंबू सरबताचे 5 हटके पर्याय, गारेगार ट्रिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 11:31 AM

Easy Different Lemonade Recipes by Pankaj Bhadauria : लिंबाच्या रसाचा वापर करुन घरच्या घरी केलेले सरबताचे वेगवेगळे फ्लेवर कसे करायचे...

राज्यभरात तापमान वाढले असून उन्हाने अक्षरश: लाहीलाही झाली आहे. भर उन्हातून आलो की आपल्याला काहीतरी गारेगार प्यावेसे वाटते. उन्हाळ्याने सतत घशाला कोरड पडत असताना थंडगार काहीतरी पोटात गेलं की आपल्याला शांत वाटतं. लिंबू सरबत हा पारंपरिक प्रकार आपण नेहमीच करतो. पण त्यापेक्षा थोडं वेगळं आणि हटके काही हवं असेल तर त्यासाठीचेच काही पर्याय आपण आज पाहणार आहोत. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया यांनी हे पर्याय सांगितले असून थोडी तयारी केली असेल तर झटपट हे सरबत तयार होतं. त्यामुळे घरी कोणी पाहुणे आले किंवा आपल्यालाही प्यायचं असेल तरी हे सरबत करायला फार वेळ लागत नाही. पाहूयात लिंबाच्या रसाचा वापर करुन घरच्या घरी केलेले सरबताचे वेगवेगळे फ्लेवर कसे करायचे (Easy Different Lemonade Recipes by Pankaj Bhadauria )...

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी करा काकडीची स्मूदी, पोटभरीचा गारेगार पर्याय- पोटाला मिळेल आराम

शुगर सिरप

सरबत करताना सगळ्यात जास्त वेळ जातो तो साखर विरघळण्यात. त्यासाठीच शुगर सिरप तयार असेल तर सरबताला वेळ लागत नाही. १ वाटी साखर आणि १ कप पाणी घेऊन ते पॅनमध्ये चांगले गरम करुन त्याचे शुगर सिरप करुन ठेवायचे. याला उकळी आली की अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळायचा. गार झाल्यावर हे सिरप एखाद्या बरणीत किंवा काचेच्या बाटलीत फ्रिजमध्ये हे सिरप बराच काळ टिकू शकते. 

(Image : Google)

लिंबाचा रस

लिंबाचा रस काढण्यासाठी लिंबं एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बुडवून ठेवायची. यामुळे लिंबू वाळून न जाता त्यातील रस दिर्घकाळ तसाच राहतो. तसेच चिरायच्या आधी तळहाताने लिंबू चांगले चोळून घ्यायचे. म्हणजे त्याचा रस निघायला सोपे जाते. आता ही लिंबं चिरुन त्याचा रस काढून एका बाटलीत भरुन ठेवावा. 

हे दोन्ही तयार असेल की आपण झटपट वेगवेगळ्या फ्लेवरची सरबतं बनवू शकतो. यामध्ये नेहमीच्या सरबताबरोबरच मसाला लेमनेड, सब्जा आणि कलिंगडाचे लेमनेड, जिंजर-मिंट लेमनेड, स्ट्रॉबेरी अँड पायनॅपल लेमनेड दाखवली आहेत. नेहमीपेक्षा थोडे वेगळे फ्लेवर असल्याने आपल्याला ही सरबतं प्यायल्याही छान वाटतं आणि हॉटेलमधील फॅन्सी ज्यूसचा फिल आल्याशिवाय राहत नाही. 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल