Join us  

नवरात्रात घरी भजनाला किंवा हळदीकुंकवाला येणाऱ्या महिलांसाठी करा उपवासाचे ४ झटपट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 10:10 AM

Easy Fasting food Options for guests in Navratri : द्यायला आणि समोरच्यांना खायला सोपे पडतील असे सोपे पर्याय...

नवरात्र म्हटलं आणि आपल्याकडे घट बसणार असतील तर बरीच धांदल असते. घट बसवणे, त्यांची आरती, उपवास, हळदी-कुंकू, कुमारीका पूजन, सवाष्ण जेवण, भजन, सप्तशतीचे पाठ किंवा स्त्रीसूक्त पठण, भोंडला असे सतत काही ना काही सुरू असते. यावेळी घरी येणाऱ्या महिलांना आपण काहीतरी डीश किंवा पेय तरी देतोच. हे पदार्थ झटपट देता येतील असे, समोरच्यांना खायला सोपे आणि तरीही द्यायला चांगले वाटतील असे असले तर जास्त चांगले. अनेक महिलांना उपवास असल्याने साधारणपणे उपवासाचेच पदार्थ केले जातात. पण उपवासाचे म्हणजे खिचडी किंवा वडा हे अनेकींना नको वाटते. आरोग्याच्या तक्रारींमुळे अनेक जण साबुदाणा खाणे टाळतात. अशावेळी महिलांना डीश म्हणून देता येतील, आरोग्यासाठी चांगले असतील असे पर्याय कोणते असू शकतात, पाहूया (Easy Fasting food Options for guests in Navratri)...

१. फ्रूट डीश

फळं ही आरोग्यासाठी चांगली असतात, साधारणपणे सगळ्यांना फळं चालतात. २ ते ३ मोजकी फळं आणली आणि ती एका डीशमध्ये दिल्यास देणाऱ्यांना आणि खाणाऱ्यांनाही सोपे जाऊ शकते. पोटभरीचा आणि सोपा पर्याय असल्याने मॅनेज करणेही सोपे असते. 

(Image : Google )

२. दूध आणि राजगिरा लाडू

मसाला दूध किंवा नुसते प्लेन दूध द्यायला सोपे असते तसेच दूध आरोग्यदायी असल्याने आपण या पर्यायाचा नक्कीच विचार करु शकतो. यासोबत २ राजगिरा लाडू किंवा राजगिऱ्याच्या वड्यांचे एक पाकीट दिल्यास पोटभरीचे आणि पौष्टीक होऊ शकते. 

३. लाडू आणि वेफर्स

दाण्याचा किंवा खजूराचा लाडू हाही महिलांना द्यायला अतिशय चांगला पर्याय असतो. आपण हे लाडू घरी तयार करु शकतो किंवा विकत आणू शकतो. त्यासोबत वेफर्स किंवा बटाट्याचा चिवडा असे काही दिल्यास गोड आणि खारट असे दोन्ही पर्याय होतात. 

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३अन्ननवरात्री