Join us  

गाजर न किसता अगदी १० मिनिटांत करा टेस्टी झटपट गाजर हलवा, जिभेवर ठेवताच अलगद विरघळेल असा स्वाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2023 2:18 PM

How to make Gajar Ka Halva : गाजराचा हलवा करायला जाता आणि गाजर किसायचा कंटाळा येतो, गाजर न किसताच बनवा झटपट होणारा गाजर हलवा...

गाजर हलवा...ही स्वीट डिश मधील सगळ्यांचीच आवडती डिश आहे. असं क्वचितच कुणी असेल ज्यांना गाजर हलवा आवडत नसेल. लालचुटुक गाजराचा गोड हलवा खाण्याचा मोह कुणालाही आवरता येणार नाही. गाजराचा हलवा खायला चविष्ट शिवाय करायला अतिशय सोपा, कुणाला गरम गरम हलवा खायला आवडतो तर कुणाला थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा वाटतो. खाण्याची पद्धत कशी का असेना, पण आवडतो मात्र सगळ्यांना(Traditional Carrot Halwa Recipes).

गाजर हलवा (Gajar Halwa Recipe) बनून तयार झाल्यानंतर खायला तर सगळ्यांनाच आवडतो. असे असले तरीही तो बनवताना गाजर किसावे लागते, तेव्हा मात्र हे फार कंटाळवाणे, किचकट काम वाटते. गाजर हलवा बनवताना गाजर किसताना हात दुखून येतो. एवढेच नाही तर गाजर हलवा काहीवेळा (Gajar ka Halwa recipe with khoya) पचपचीत बनतो. रोजची बाकीची कामं सांभाळून तासनतास गाजर किसायचे म्हणजे खूपच त्रासदायक वाटतं. अशावेळी हवा तसा मनासारखा गाजर हलवा तयार झाला नाही तर हिरमोड होतो. अशावेळी एक सोपी ट्रिक वापरुन (Easy Gajar Halwa Recipe With Khoya Made In A Pressure Cooker) आपण गाजर न किसता झटपट कुकरमध्ये तयार होणारा गाजराचा परफेक्ट हलवा बनवू शकतो. गाजर न किसता अगदी चटकन होणारा चविष्ट गाजर हलवा बनवण्याची सोपी रेसीपी(carrot halwa with khoya rich and tasty halwa recipe). 

साहित्य :- 

१. गाजर - दिड किलो २. साजूक तूप - पाव कप ३. दूध - १ लिटर ४. साखर - ३०० ग्रॅम ५. खवा - पाव किलो (किसून घेतलेला)६. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून ७. काजू व बदामाचे काप - प्रत्येकी १/२ कप 

थालीपीठाची भाजणी संपली ? भाजणी शिवाय बनवा अगदी १० मिनिटांत कारवार स्पेशल रवा थालीपीठ....

अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

कृती - 

१. सर्वप्रथम लालचुटुक गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. २. साल काढून घेतल्यानंतर या गाजराचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. ३. आता एका कुकरमध्ये साजूक तूप घालून त्यात हे गाजरचे तुकडे घालूंन घ्यावेत. साजूक तुपावर हे तुकडे व्यवस्थित शिजवून घ्यावेत. ४. कुकरचे झाकण लावून ३ ते ४ मिनिटे ही गाजर तुपात खमंग सुवास येईपर्यंत शिजवून घ्यावीत. ५. गाजर व्यवस्थित शिजून तयार झाल्यानंतर यात अर्धा कप दूध घालावे. ६. दूध घातल्यानंतर कुकरचे झाकण लावून याला ३ ते ४ शिट्ट्या काढून घ्याव्यात. 

ड्रायफ्रुट्सचे काप करणं किचकट काम, खूप वेळ लागतो ? २ सोप्या ट्रिक्स, झटपट करा भरपूर पातळ काप...

वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...

७. त्यानंतर कुकरचे झाकण उघडून शिजवून घेतलेले गाजर मॅशरने हलकेच दाबून बारीक करुन घ्यावेत. ८. गाजर हलकेच मॅश करुन घेतल्यानंतर त्यात गरम करून घेतलेले १ लिटर फुल फॅट दूध घालावे. ९. आता दूध आणि गाजर चांगले एकजीव होईपर्यंत मोठ्या आचेवर गरम करत ठेवून चमच्याने ढवळत राहावे. १०. त्यानंतर दूध संपूर्ण आटेपर्यंत अर्धा तास हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यावे. ११. दूध संपूर्ण आटल्यावर यात साखर व खवा घालून घ्यावा. १२. साखर व खवा संपूर्ण विरघळल्यांनतर यात अर्धा कप गरम तूप घालून घ्यावे. १३. आता यात तेलात तळून घेतलेले काजू व बदामाचे काप घालावेत, सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून घ्यावी. 

मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...

आता हा गाजर हलवा थंड झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून त्यावर ड्रायफ्रूट्सचे काप घालून फ्रिजमध्ये २ ते ३ तास सेट होण्यासाठी ठेवून द्यावा.

टॅग्स :अन्नपाककृती