भाजीमध्ये बटाटे प्रत्येक पदार्थात फिट होतो. अनेकांना बटाटे खूप आवडतात. बटाट्याचे अनेक पदार्थ केले जातात. पदार्थात बटाटा घालताच, त्याची चव दुपटीने वाढते. आलू पराठा, बटाटा वडा, पिवळ्या बटाट्याची भाजी यांसारखे पदार्थ करण्यासाठी शिजलेल्या बटाट्याचा वापर होतो. मात्र, बटाटा लवकर शिजत नाही. ज्यामुळे पदार्थाची पुढील प्रोसेस करण्यास खूप वेळ जातो. बटाटे पहिलेच उकडलेले असतील तर, पदार्थ करण्यास जास्त वेळ लागत नाही.
काही वेळेस बटाटे अर्धे शिजतात तर, काही वेळेला जास्त प्रमाणात शिजतात. बटाटा शिजण्यासाठी साधारण १० ते १५ मिनिटे लागतात. परंतु, ५ मिनिटात जर बटाटे परफेक्ट शिजवायचे असतील तर, ही ट्रिक आपल्याला नक्की मदत करेल. या ट्रिकमुळे बटाटे ५ मिनिटात तर शिजतीलच, शिवाय यामुळे गॅस देखील वाचेल(Easy Hacks To Boil Potatoes Quickly).
वाफवण्याचं टेन्शन सोडा, कमी वेळात करा खमंग कोथिंबीर वडी! १५ मिनिटांत झटपट वडी
५ मिनिटात बटाटे शिजवण्याची ट्रिक
५ मिनिटात बटाटे शिजवण्यासाठी एकाच आकाराचे बटाटे घ्या, व त्याचे मधोमध काप करा. त्यानंतर बटाटे २ ते ३ वेळा पाण्यातून धुवून काढा. कुकरच्या भांड्यात ३ कप पाणी घाला. जितके बटाटे आहेत त्याहून जास्त प्रमाणात पाणी घाला. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबू कापून घाला. मीठ आणि लिंबूमुळे बटाटे लवकर शिजतात, व फुटत देखील नाही. प्रेशर कुकर झाकणाने बंद करा. साधारण एका शिट्टीत किंवा ३ मिनिटात बटाटे शिजतील. या ट्रिकमुळे बटाटे लवकर शिजतील, व फुटणार देखील नाही.
प्रसाद म्हणून ठेवलेली केळी जास्त पिकली? करा केळीचा शिरा, झटपट आणि सोपी रेसिपी
दुसरी पद्धत
जर आपला प्रेशर कुकर खराब झाला असेल, किंवा प्रेशर कुकरशिवाय बटाटे शिजवायचे असतील तर, भांड्याचा वापर करा. यासाठी बटाटे चौकोनी आकारामध्ये चिरून घ्या. नंतर २ ते ३ वेळा पाण्यात धुवून घ्या. भांड्यामध्ये पाणी घाला. त्यात चिरलेले बटाटे घालून शिजवून घ्या. बटाटे चिरून घेतल्यामुळे ते लवकर शिजतील.