Lokmat Sakhi >Food > सकाळच्या नाष्त्याला आवडीनं पोहे खाल तर शरीराला मिळतील 'हे' फायदे; जाणून घ्या विविध प्रकार

सकाळच्या नाष्त्याला आवडीनं पोहे खाल तर शरीराला मिळतील 'हे' फायदे; जाणून घ्या विविध प्रकार

Easy Healthy Breakfast Ideas Poha benefits : पोहे खाल्यानं शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. जेव्हा शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:26 PM2021-06-06T15:26:30+5:302021-06-06T15:40:34+5:30

Easy Healthy Breakfast Ideas Poha benefits : पोहे खाल्यानं शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. जेव्हा शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

Easy Healthy Breakfast Ideas : Poha breakfast ideas 6 delicious poha recipes breakfast and Benefits | सकाळच्या नाष्त्याला आवडीनं पोहे खाल तर शरीराला मिळतील 'हे' फायदे; जाणून घ्या विविध प्रकार

सकाळच्या नाष्त्याला आवडीनं पोहे खाल तर शरीराला मिळतील 'हे' फायदे; जाणून घ्या विविध प्रकार

Highlightsसकाळी नाष्ता करून झाल्यानंतर आपल्या दिवसभरात खूप काम करावी लागतात. जर आपण सकाळीच पोटभर खाल्लं असेल तर  काळजी नसते. नाष्त्याला पोहे खाल्याने दुसरं काही खाण्याची गरज भासत नाही.पोहे बनवत असताना  शेंगदाणे कधी बटाटे, अन्य ड्रायफ्रुट्स आणि कांद्यांचा वापर केला जातो. पोह्यांच्या सेवनानं शरीराला पोषण मिळतं.  

पोहे म्हटलं सकळाच्या नाष्त्याची वेळ आठवते. आपल्या सगळ्यांनाच घरी आलटून पालटून पोह्याचा नाष्ता केला जातो. तुम्ही डाएटवर असाल किंवा नसाल तरी नाष्त्याला पोहे खाण्याइतका सोपा, स्वस्त आणि पौष्टीक पर्याय सापडणार नाही. शेंगदाणे, कोंथिंबर अन् वर ओलं खोबरं टाकलेली पोह्याची डीश केव्हाही पाहिली की तोंडाला  पाणी सुटतं. आज आम्ही तुम्हाला पोहे खाल्यानं शरीराला कोणते फायदे मिळतात. इतर पदार्थांच्या तुलनेत नाष्ट्यासाठी पोहेच का निवडावेत याबाबत सांगणार आहोत. 

उर्जा मिळते

सकाळी नाष्ता करून झाल्यानंतर आपल्या दिवसभरात खूप काम करावी लागतात. जर आपण सकाळीच पोटभर खाल्लं असेल तर  काळजी नसते. नाष्त्याला पोहे खाल्याने दुसरं काही खाण्याची गरज भासत नाही. पोहे खाल्यानं पोट भरतं. पोह्यात कार्बोहायड्रेट्स असतात. दिवसाची चांगली सुरूवात होण्यासाठी तसंच उर्जा मिळण्यासाठी पोहे हा अतिशय उत्तम पर्याय आहे. 

पोषण आणि चव दोन्ही मिळतात

पोहे बनवत असताना  शेंगदाणे कधी बटाटे, अन्य ड्रायफ्रुट्स आणि कांद्यांचा वापर केला जातो. पोह्यांच्या सेवनानं शरीराला पोषण मिळतं.  तसंच खाताना वेगवेगळ्या चवींचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. चवीनं खाण्याबरोबरच पोषणही मिळत असल्यामुळे पोह्याचा समावेश नाष्त्यासाठी करायला हवा. 

पोषक घटकांची कमतरता भरून निघते

पोहे खाल्यानं शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. जेव्हा शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. शरीरातील ऑक्सिनजनची लेव्हल वाढते आणि  नेहमी निरोगी राहता येतं. डायबिटिस असलेल्या रुग्णांसाठीही पोहे फायदेशीर ठरू शकतात. कमी तेलात पोहे तयार करून सकाळच्या नाष्त्याला दिल्यास डायबिटिस असलेल्या रुग्णांसाठीही हा उत्तम ठरू शकतो. 

बारीक होण्यासाठी चांगला पर्याय

पोह्यात खूप कमी कॅलरिज असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ब्रेड बटर किंवा टोस्ट वैगेरे खाणं सोडून द्या आणि पोह्याचा नाष्ता करा. यामुळे तुम्हाला उर्जा मिळेल तसंच वजन कमी होण्यास मदत होईल. शरीरातील पोषक घटकांची  कमतरता भरून काढता येते. वजन नेहमी नियंत्रणात ठेवण्याासाठी पोहे हा चांगला पर्याय आहे. 

पचनक्रिया चांगली राहते

पोह्याच्या  सेवनानं पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही नाष्त्यासाठी  कोणतेही बाहेरचे पदार्थ खात असाल तर ते पचण्यास वेळ लागतो. पण नाष्त्याला पोहे खाल्यास पचायला फारसा वेळ लागत नाही. पोहे एक फाइबर युक्त एक लाइट फूड आहे.  पचनासाठी चांगले असून शरीराला दीर्घकाळ उर्जा मिळण्यास मदत होते.

पोहे बनवण्याचे प्रकार

१) कांदे पोहे, बटाटे पोहे - तुम्ही सकाळच्या नाष्त्याला कांदा, बटाटा घालून आणि राई, जिरं, कडीपत्त्याची फोडणी देऊन शेंगदाण्यांसह पोहे खाण्याचा आनंद घेऊ शकता.

२) सोया पोहे- अतिशय चवदार, हलकी आणि बनवण्यास सोपी पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला सोयाची गुणधर्म मिळतील. यासह आपण आपला दिवस निरोगी मार्गाने सुरू करू शकता.

३) क्रॅनबेरी बदाम पोहे- हे पोहे हेल्दी असून पौष्टिक पदार्थ समृद्ध आहे जे तुम्ही सहज घरी बनवू शकता. बदाम आणि क्रॅनबेरी फ्लेवर्समध्ये भरलेला हा पोहा खूप फायदेशीर आहे. या पोह्याची खास गोष्ट म्हणजे शून्य कोलेस्ट्रॉलबरोबर प्रथिने आणि कॅल्शियमचे बरेच प्रमाण आहे. यात तुम्ही इतरही फळं घालून खाऊ शकता.

४) लाल तांदूळ पोहे- लाल तांदळापासून बनवलेल्या या पोह्याचे असंख्य आरोग्यासाठी फायदे आहेत कारण इतर तांदूळांपेक्षा लाल तांदळावर प्रक्रिया कमी होते.

५) स्टिम पोहे- स्टीम्ड पोहे बनविणे खूप सोपे आहे आणि आपणसुद्धा काही मिनिटांत ते बनवून आनंद घेऊ शकता. याशिवाय काहीजणांना बिस्किट्स,  टोस्य यापैकी काहीच नसेल तर चहात  पोहे टाकून  खाण्याची सवय असते. हा देखिल चांगला पर्याय आहे. 

Web Title: Easy Healthy Breakfast Ideas : Poha breakfast ideas 6 delicious poha recipes breakfast and Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.