पावसाळ्यात काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. चहा, कॉफी प्यायला आवडत असेल तरी सारखं सारखं चहा-कॉफी पिणं तब्येतीसाठी चांगलं नसतं. (Vegetable Soup Recipe) जेवताना किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर सूप हा उत्तम पर्याय आहे. (How to Make Homemade Soup) पावसाळ्याच्या दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. कॉर्न सूप, पालक सूप, मिक्स व्हेज सूप, टोमॅटो सूप तुम्ही घरीच बनवू शकता. हे सूप प्यायल्यानं तुम्हाला पुरेपूर पोषण मिळतं (Easy Homemade Vegetable Soup) आणि तोंडाला चवही येते.
१) व्हेजिटेबल सूप कसे बनवावे?
गॅसवर भांडे ठेवा. भांडे गरम झाल्यावर त्यात बटर घालावे. आच मंद ठेवा. बटर वितळल्यावर त्यात चिरलेल्या लसूण पाकळ्या घाला. ते तळल्यानंतर, स्प्रिंग ओनियन्स घाला. सतत ढवळत राहा आणि आधीच उकडलेल्या भाज्या या भांड्यात टाका. मग थोडं पाणी घाला. उकळायला लागल्यावर चवीनुसार मीठ घाला. आणखी काही वेळ उकळल्यानंतर पाण्यात आधीच विरघळवलेले कॉर्नफ्लोर घाला. नीट ढवळून झाल्यावर त्यात चिमूटभर काळी मिरी पावडर घाला.
व्हेजिटेबल सूपमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळेच नियमित या सूपचे सेवन केल्यानं त्वचा चमकदार दिसते आणि व्हेजिटेबल सूप प्रोटीन्स, फॅट आणि मिनरल्सचेही स्त्रोत आहे. यातील तत्व लहान मुलांमध्ये एनर्जी टिकवून ठेवण्यात मदत करतात. लहान मुलांना जेव्हा गॅस, एसिडीटीचा त्रास होतो तेव्हा व्हेजिटेबल सूप फायदेशीर ठरते. नियमित हे सूप लहान मुलांना पाजल्यानं त्यांना पोषण मिळतं. भाज्यांच्या सूपमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ते शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर आहे.
२) जिंजर गार्लिक सूप
एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये बारीक केलेले आलं आणि लसूण घाला आणि गॅस बारीक ठेवून चांगले परतून घ्या. अर्धी वाटी पाण्यात कॉर्नफ्लोअर घालून ते चांगले एकजीव करुन ठेवा. गाजर आणि कोबी बारीक किसून घ्या आणि फरसबी एकदम बारीक चिरुन घ्या. पॅनमध्ये या भाज्या घालून त्यावर झाकण ठेवा आणि एक वाफ येऊद्या. त्यामध्ये भाज्या घालून चांगली उकळी येऊद्या. मग कॉर्नफ्लोअर घालून चांगले एकजीव करा आणि मीठ, मिरपूड घालून ५ ते ७ मिनीटे उकळवा. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घाला आणि गरमागरम सूप प्यायला घ्या. यामध्ये आवडीनुसार कांद्याची पात, शिमला मिरची, लिंबाचा रस असे काहीही घालू शकता.
३) गाजर बीट टोमॅटो सूप
सगळ्यात आधी टोमॅटो, बीट आणि कांद्याचे मोठे काप करून घ्या, गाजराची साले काढून त्याचेही काप करून घ्या, कुकरमध्ये तूप आणि तेल टाका. त्यात तमालपत्र, वेलची, मीरी, आलं, लसूण टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा टाकून परतून घ्या.कांदा परतून झाला की टोमॅटो, बीट, गाजर टाकून परतून घ्या.त्यानंतर कुकरचं झाकण लावून टाका आणि २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड होऊ द्या. नंतर हे मिश्रण बारीक करुन त्यात थोडं पाणी घालून पातळ सूप तयार करा. यात मीठ आणि काळी मिरी पावडर वरून घाला.