Lokmat Sakhi >Food > घरच्याघरी कलाकंद करण्याची झटपट कृती, हवं फक्त दूध-साखर आणि ब्रेड

घरच्याघरी कलाकंद करण्याची झटपट कृती, हवं फक्त दूध-साखर आणि ब्रेड

Easy Kalakand recipe : दूध आणि दूधाचे पदार्थ तब्येतीसाठी पौष्टीक असतात. पेस्ट्री, आईस्क्रीम खाण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी ब्रेड आणि दुधाचा वापर करून कलाकंद बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:33 AM2023-04-19T09:33:00+5:302023-04-19T15:20:25+5:30

Easy Kalakand recipe : दूध आणि दूधाचे पदार्थ तब्येतीसाठी पौष्टीक असतात. पेस्ट्री, आईस्क्रीम खाण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी ब्रेड आणि दुधाचा वापर करून कलाकंद बनवू शकता.

Easy Kalakand recipe : No ghee, no mava 2 glasses of milk 1 kg sweetmeat; delicious, easy Kalakand recipe | घरच्याघरी कलाकंद करण्याची झटपट कृती, हवं फक्त दूध-साखर आणि ब्रेड

घरच्याघरी कलाकंद करण्याची झटपट कृती, हवं फक्त दूध-साखर आणि ब्रेड

नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची  इच्छा होते. अशावेळी नेहमीच बाहेरून काही आणण्यापेक्षा घरच्याघरी तुम्ही उत्तम पदार्थ तयार करू शकता. (Easy Kalakand recipe) घरच्याघरी स्वादीष्ट मिठाई तयार करण्यासाठी  तुम्हाला जास्त काही लागणार नाही फक्त दुधाची आवश्यकता असले जे आपल्या सर्वांच्याच घरी उपलब्ध असतं. (How to make mithai from milk)

दूध आणि दूधाचे पदार्थ तब्येतीसाठी पौष्टीक असतात. पेस्ट्री, आईस्क्रीम खाण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी ब्रेड आणि दुधाचा वापर करून कलाकंद बनवू शकता. (Kalakand Sweet Recipe in 30 mins) ऐरवी दूध फाटल्यानंतर लोक कलाकंद बनवतात. पण कलाकंद मिठाईची ही सोपी रेसेपी पाहिल्यानंतर तुम्हालाही हा पदार्थ ट्राय करण्याचा मोह आवरला जाणार नाही. (Milk Kalakand Recipe)

1) ही मिठाई बनण्यासाठी सगळ्यात आधी  कढईत १ लिटर दूध गरम करायला ठेवा. त्यात ४ चमचे साखर घाला. व्यवस्थित ढवळून घ्या आणि हे मिश्रण बासुंदीप्रमाणे जाड होऊ द्या.

2) एकदा मिश्रण जाड झालं की त्यात केशर आणि बदामाचे, पिस्त्याचे काप घाला. नंतर ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्या साईडच्या कडा काढून घ्या.

3) एका पसरट भांड्यात  शिजवलेलं दूध पसरवून घ्या.  त्यावर साईड्स कट केलेले ब्रेडचे स्लाईस घाला आणि प्रत्येक ब्रेड स्लाईसवर चमचा भर दूध घाला.  

४) त्यानंतर शिजवलेल्या दूधाचं मिश्रण या ब्रेडच्या तुकड्यांवर घालून पुन्हा त्यावर ब्रेडचे  तुकडे ठेवा आणि परत दूधाचा थर तयार करा.

५) पिस्ता आणि  बदामाचे तुकडे यावर घालून फ्रिजमध्ये १ ते २ तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवा. तयार आहे स्वादीष्ट कलाकंद 

Web Title: Easy Kalakand recipe : No ghee, no mava 2 glasses of milk 1 kg sweetmeat; delicious, easy Kalakand recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.