Lokmat Sakhi >Food > कोकणी पद्धतीची मऊसूत आंबोळी करायची आहे? साहित्य वाटताना त्यात मिसळा एक सिक्रेट गोष्ट, आंबोळ्या होतील परफेक्ट..

कोकणी पद्धतीची मऊसूत आंबोळी करायची आहे? साहित्य वाटताना त्यात मिसळा एक सिक्रेट गोष्ट, आंबोळ्या होतील परफेक्ट..

Easy Malvani Amboli Recipe : चपाती-डोसा नेहमीचाच, यंदा नाश्त्याला कोकणी स्पेशल आंबोळ्या करून पाहा, पारंपारिक रेसिपी - चवीला भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 12:05 PM2023-12-05T12:05:00+5:302023-12-05T12:05:55+5:30

Easy Malvani Amboli Recipe : चपाती-डोसा नेहमीचाच, यंदा नाश्त्याला कोकणी स्पेशल आंबोळ्या करून पाहा, पारंपारिक रेसिपी - चवीला भारी

Easy Malvani Amboli Recipe | कोकणी पद्धतीची मऊसूत आंबोळी करायची आहे? साहित्य वाटताना त्यात मिसळा एक सिक्रेट गोष्ट, आंबोळ्या होतील परफेक्ट..

कोकणी पद्धतीची मऊसूत आंबोळी करायची आहे? साहित्य वाटताना त्यात मिसळा एक सिक्रेट गोष्ट, आंबोळ्या होतील परफेक्ट..

नाश्त्याला पोहे, उपमा, चपाती-भाजी, गुजराथी यासह साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेदू वडा आवडीने खाल्ला जातो. पण कोकणात देखील आंबोळी (Amboli) हा पदार्थ तितकाच फेमस आहे. 'आंबोळी' हा पदार्थ मऊ, लुसलुशीत, छान जाळीदार झाला तरच खायला मजा येते.

आंबोळी तयार करण्याची पद्धत ही डोश्याप्रमाणेच असते. पण याचे पीठ तयार करताना योग्य प्रमाणात साहित्यांचा वापर करून करावे लागते. अन्यथा आंबोळ्या बिघडतात. जर आपल्याला नाश्त्याला (Breakfast Recipe) तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा आंबोळ्या नक्कीच करून पाहा (Cooking Tips). या प्रमाणात साहित्यांचा वापर करून आंबोळ्या केल्यास, चवीला भन्नाट-परफेक्ट तयार होतील(Easy Malvani Amboli Recipe).

आंबोळ्या करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

उडीद डाळ

मेथी दाणे

पोहे

मीठ

विकतचा कशाला? घरीच २ वाटी चणा डाळीचा करा गुजराथी स्पेशल खमण ढोकळा, ना इनोची गरज - ना अधिक मेहनत

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये ३ कप तांदूळ घ्या, दुसऱ्या बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ आणि मेथी दाणे, तर तिसऱ्या बाऊलमध्ये अर्धा कप पोहे घ्या. नंतर तांदूळ आणि डाळीच्या बाऊलमध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. डाळ -  तांदूळवर ६ ते ८ तासांसाठी झाकण ठेऊन भिजत ठेवा. ६ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेले तांदूळ घालून वाटून घ्या, नंतर डाळ आणि भिजलेले पोहे घालून वाटून घ्या. दोन्ही साहित्य एकत्र हाताने मिक्स करा. पिठावर झाकण ठेऊन रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा.

दुसऱ्या दिवशी झाकण उघडून पाहा, आपल्याला दिसेल पीठ छान फुललेले पाहायला मिळेल. त्यात चवीनुसार मीठ घालून पीठ एका बाजूने ढवळून घ्या. बीडाचा तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडे तेल लावून पसरवा. गरम तव्यावर चमचाभर पीठ घालून गोलाकार पसरवून घ्या. डोश्याप्रमाणे पसरवू नये, कारण आंबोळ्या जाडसर असतात.

ना तूप-तेल, ना गुळ-साखर, फक्त ३ कपभर ड्रायफ्रुट्सचे करा पोष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत, सर्दी-खोकलाही राहील लांब

नंतर त्यावर झाकण ठेवा. २ मिनिटांसाठी वाफेवर आंबोळी शिजवून घ्या. २ मिनिटानंतर परतून दुसरी बाजू १ ते २ मिनिटांसाठी भाजून घ्या. तयार आंबोळी एका प्लेटमध्ये काढून घ्या, व उरलेल्या पीठाचे देखील आंबोळ्या करून घ्या. अशा प्रकारे आंबोळ्या खाण्यासाठी रेडी. आपण आंबोळ्या चटणीसोबत खाऊ शकता. 

Web Title: Easy Malvani Amboli Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.