Join us  

अर्धा लिटर दूधात घरीच करा स्वादिष्ट मावा कुल्फी; मस्त गारेगार कुल्फीची झटपट रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:39 AM

Easy Mawa Kulfi Recipe : बाहेरच्या सारखी कुल्फी घरच्याघरी बनवता येऊ शकते. घरच्याघरी चवदार कुल्फी बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया.

उन्हाळा सुरू झाला की सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे आईस्क्रीम. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर घश्याला गारवा मिळतो आणि मनही आनंदीत होतं. केशर पिस्ता, वेनिला, बटरस्कॉच, चॉकोचिप्स, मॅगो, वॉलनट क्रंच अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम स्कूपमध्ये तर कधी कोनमध्ये खायची इच्छा होते. (Kulfi Recipe)

बाहेरच्या सारखी कुल्फी घरच्याघरी बनवता येऊ शकते. घरच्याघरी चवदार कुल्फी बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. जी बनवायला अगदी काही मिनिटं लागतील आणि घरातले सगळेजण मनसोक्त आईस्क्रीम खातील. (How to make Kulfi at Home)

घरच्याघरी कुल्फी कशी बनवायची

१) एका पातेल्यात दूध घेऊन उकळी येईपर्यंत मंद आचेवर शिजवा.

२) दूध अर्धे होईपर्यंत शिजवा. आता त्यात खवा, साखर, वेलची पूड आणि बदाम, पिस्ते घालून एकत्र करून शिजवा.3.5 ते 10 मिनिटे शिजवा आणि थोडे घट्ट होऊ द्या. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. 

३) मिश्रण थंड झाल्यावर कुल्फीच्या साच्यांमध्ये ठेवा आणि रात्रभर  सेट होण्यासाठी  फ्रिजमध्ये ठेवा. साचा भांड्यात ठेवून, बाहेर काढा. थंडगार, चविष्ट कुल्फी सर्वांना सर्व्ह करा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न