आपण नाश्त्याला बरेच जण दाक्षिणात्य पदार्थ आवडीने खातो (Medu Vada). साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली, आप्पे, डोसा, उपमा, मेदूवडा फार फेमस आहेत. ज्यात मेदूवडे खाणाऱ्या खवय्यांचा वर्ग मोठा आहे (Cooking Tips). मेदूवडा हा उडीद डाळीपासून तयार होणारा दाक्षिणात्य पदार्थ आहे. मेदूवडे फक्त साऊथमध्ये नसून, इतर प्रांतातही आवडीने खाल्ला जातो.
महाराष्ट्रातील अनेक भागात मेदूवडे केले जातात. पण घरात तयार करताना ते परफेक्ट तयार होत नाहीत. मेदूवड्याचा आकार बिघडतो, किंवा मेदूवडे तेल फार पितात. जर आपल्याला दाक्षिणात्य पद्धतीचे मेदूवडे करायचे असतील तर, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा(Easy Medu Vada Recipe | How To Make Cripsy Medu Vada).
दाक्षिणात्य पद्धतीचे मेदूवडे करण्यासाठी लागणारं साहित्य
उडीद डाळ
पाणी
कोथिंबीर
कडीपत्ता
आलं
हिरवी मिरची
मेहेंदीचा रंग फिकट - डिझाईनही जमत नाही? ४ ट्रेण्डी सोप्या डिझाईन्स; हात दिसतील सुंदर
ओलं खोबरं
काळी मिरी पूड
मीठ
हिंग
तेल
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ कप उडीद डाळ घ्या. त्यात पाणी घालून डाळ धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घालून डाळ भिजत ठेवा. ४ ते ५ तासानंतर डाळ भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात एक कप पाणी घालून डाळ वाटून घ्या.
वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..
डाळीची तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कडीपत्ता, आलं, हिरवी मिरची, ओलं खोबरं, काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ, चिमुटभर हिंग घालून साहित्य एकजीव करा.
दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर हाताला थोडे तेल लावा. मिश्रण तळहातावर घ्या, आणि त्याला मेदू वड्याचा आकार द्या व गरम तेलात हलक्या हाताने सोडा. मेदूवडे दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत मेदू वडे खाण्यासाठी रेडी.