Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड नको, सारण नको - करा १० मिनिटात नैवेद्याला पौष्टिक मोदक...

संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड नको, सारण नको - करा १० मिनिटात नैवेद्याला पौष्टिक मोदक...

Easy Modak Recipe : Nutritious Modak In Just 10 Minutes : घरांत उपलब्ध असणाऱ्या निवडक पदार्थांचा वापर करुन आपण झटपट मोदक तयार करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 01:09 PM2023-03-11T13:09:16+5:302023-03-11T13:23:47+5:30

Easy Modak Recipe : Nutritious Modak In Just 10 Minutes : घरांत उपलब्ध असणाऱ्या निवडक पदार्थांचा वापर करुन आपण झटपट मोदक तयार करु शकतो.

Easy Modak Recipe, Nutritious Modak In Just 10 Minutes... | संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड नको, सारण नको - करा १० मिनिटात नैवेद्याला पौष्टिक मोदक...

संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड नको, सारण नको - करा १० मिनिटात नैवेद्याला पौष्टिक मोदक...

'मोदक' हे नाव जरी उच्चारल तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत. घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे 'मोदक'. काही सण असो किंवा घरात पूजा असो, नैवेद्य करायचा म्हटलं की, सगळ्यांत पहिल्यांदा मोदकाचेच नाव घेतले जाते. संकष्टी, अंगारकी या दिवशी तर हमखास सगळ्यांच्याच घरी मोदक आवर्जून केले जातात. 

मोदक खायला जितके आवडतात तितकेच करायला खूप मोठा घाट घालावा लागतो. एवढी मेहेनत करुन मोदक मनासारखे झाले तर खूपच आनंद होतो. याउलट मोदक फसले किंवा बिघडले तर दुप्पट हिरमोड आणि चिडचिड होते, ती वेगळीच. मोदक करायचे म्हटलं की, गुळ किसा, सारण बनवा, पीठ भिजवा, पाऱ्या लाटा असे असंख्य साग्रसंगीत प्रकार करावे लागतात. मोदक तर बनवायचे असतात परंतु त्यासाठीचा एवढा मोठा घाट घालणे, कोणालाही पसंत नसते. अशावेळी घरांत उपलब्ध असणाऱ्या काही निवडक पदार्थांचा वापर करुन आपण झटपट मोदक तयार करु शकतो(Easy Modak Recipe : Nutritious Modak In Just 10 Minutes).      

साहित्य :- 

१. खजूर - १० ते १५ 
२. खडीसाखर - १०० ग्रॅम 
३. खसखस - १ टेबलस्पून 
४. डेसिकेटेट कोकोनट - ५० ग्रॅम 
५. मावा - २०० ग्रॅम 
६. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम खजुराच्या बिया वेगळ्या काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. ते खजुराचे तुकडे मिक्सरला वाटून त्याची बारीक पूड करुन घ्यावी. 
२. खडीसाखर घेऊन त्याचे बारीक तुकडे करुन हे खडे मिक्सरला लावून त्याची बारीक पूड करून घ्यावी. 
३. आता एका पॅनमध्ये खसखस घेऊन ते मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावेत. त्यानंतर खजुराची बारीक करुन घेतलेली पूड व डेसिकेटेट कोकोनट यात घालून हे सगळे जिन्नस कोरडेच भाजून घ्यावेत. 
४. हे सगळे जिन्नस कोरडे भाजून त्यांना हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर ते एका भांड्यात काढून थोडे गार होण्यासाठी ठेवून द्या. 


५. आता पॅनमध्ये मावा घेऊन तो व्यवस्थित मऊ करुन थोडाला परतून घ्या. माव्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. 
६. मावा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर खजुराचे कोरडे भाजून घेतलेले मिश्रण यात घालावे. थोडेसे परतून घ्यावे. 
७. आता गॅस बंद करुन या मिश्रणात बारीक वाटून घेतलेली खडीसाखर, वेलची पूड घालावी. आता हे मिश्रण थोडे गार होण्यासाठी ठेवावे. 
८. मिश्रण थोडे गार झाल्यावर हातांच्या मदतीने ते सगळे एकजीव करुन घ्यावे. माव्याच्या गुठळ्या राहिल्या असतील तर त्या हाताने फोडून एकजीव करुन घ्याव्यात. 
९. आता मोदकाचा साचा घेऊन त्यात हे तयार मिश्रण भरुन झटपट मोदक तयार करुन घ्यावेत. 

खजुराची पूड व डेसिकेटेट कोकोनट वापरुन झटपट तयार केलेलं मोदक खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Easy Modak Recipe, Nutritious Modak In Just 10 Minutes...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.