नाश्त्याला काहीतरी खमंग खाण्याची इच्छा अनेकदा होते. (Breakfast Recipe) दिवसभर उत्साही राहण्यासाठी नाश्ता फार महत्वाचा आहे. नाश्त्याला पोहे, चहा चपाती, उपमा, इडली हे पदार्थ खाऊन कंटाळा आला की नवीन काहीतरी जसं की भजी, पकोडे खावेसे वाटतात. मुग डाळ इतर कोणत्याही डाळींपेक्षा पचायला हलकी असते. मूगाच्या डाळीत फायबर्स, प्रोटीन्स असतात. सकाळी नाश्त्याला या डाळीपासून बनवलेला पदार्थ खाल्ल्यास दिवसभर पोट भरल्यासारखं वाटेल. (How to make mong dal pakoda)
कृती
१) कप मूग डाळ घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. डाळीचा हिरवा भाग अर्धा काढून टाका आणि नंतर पाणी काढून टाका आणि पाण्याशिवाय ब्लेंडरमध्ये घालून बारीक वाटून घ्या.
फक्त १० मिनिटांत करा तांदळाची स्वादिष्ट खीर, झटपट आणि सोपी कृती-चव अप्रतिम
२) दळलेली दाळ, 1/2 कप कांदा, 1 टीस्पून हिरवी मिरची, 1/2 कप पालक, 1/4 टीस्पून हिंग, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 कप धणे, 1 टीस्पून आले, 1 टीस्पून ठेचलेली कोथिंबीर, 1 टीस्पून घाला. मूग डाळ आणि मिक्स करा.
३) तेल गरम करा, तळण्याआधी मीठ घालून मिक्स करा, एक एक करून भजी तेलात टाका आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा सॉस आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
६ महिने टिकेल घरी बनवलेली आलं, लसणाची पेस्ट; पाहा पेस्ट बनण्याची योग्य पद्धत
मूग डाळीचे इतर पदार्थ
मूगाची डाळ पचायला हलकी असल्यानं आरोग्याला अनेक फायदे देते. तुम्ही मुगाच्या भजी व्यतिरिक्त मुगाचे डोसेसुद्धा नाश्ता किंवा जेवणासाठी बनवू शकता. यासाठी रात्री मुगाची डाळ भिजत ठेवा. सकाळी पाणी उपसून मुगाची डाळ, मीठ, मिरची, गरजेनुसार मसाले, कोथिंबीर, पाणी घालून दळून घ्या. दळलेल्या मिश्रणाचे नॉन स्टीक तव्यावर डोसे बनवू शकता. याशिवाय मुगाच्या डाळीच्या डाळीची खिचडी जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. रात्रीच्या जेवणात हलका आहार म्हणून तुम्ही ही खिचडी बनवू शकता.