Join us  

ना भाजणी बनवायचे टेंन्शन, ना तेलात चकली विरघळण्याची झंझट, १० मिनिटात करा, स्पिन्याच बटर चकली....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 1:14 PM

how to make spinach butter chakli : यंदाच्या दिवाळीला दरवर्षीची तीच ती भाजणीची चकली करण्यापेक्षा आपण स्पिन्याच बटर चकली घरच्या घरी बनवू शकतो.

दिवाळीच्या (Diwali 2023) खास फराळाच्या ताटातील सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे चकली. चकली शिवाय फराळाचे ताट हे अपूर्णच आहे. फराळाच्या ताटातील लाडू, शंकरपाळे, मिठाया, करंजी असे गोड पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल, किंवा काहीतरी तिखट, मसालेदार खावेसे वाटत असेल तर चकली (how to make spinach butter chakli) हा एकमेव पर्याय आहे. कुरकुरीत, मसालेदार, काटेरी चकली खायला सगळ्यांनाच आवडते. फराळाच्या ताटातील चकली हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहेच(palak chakli recipe).

फराळाची चकली (spinach murukku) म्हटलं की, आपल्याला सर्वात आधी आठवते ती भाजणीची खरपूर, कुरकुरीत चकली. भाजणीची चकली (palak murukk) बनवण्यासाठी आपल्याला आधी चकलीची भाजणी तयार करुन घ्यावी लागते. ही भाजणी जर परफेक्ट झाली तर ठिक, भाजणी बनवताना जरा गडबड, गोंधळ झाला की चकली फसलीच म्हणून समजा. भाजणीची चकली बनवण्यासाठी भाजणी उत्तम तयार होणे गरजेचे असते. परंतु असे असले तरीही आजकाल बाजारांत वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या चकल्या अगदी सहज विकत मिळतात. तांदुळाची चकली, बटर चकली, शेजवान चकली अशा असंख्य फ्लेवर्समध्ये चकल्या उपलब्ध असतात. यंदाच्या दिवाळीला दरवर्षीची तीच ती भाजणीची चकली करण्यापेक्षा आपण स्पिनच बटर चकली घरच्या घरी बनवू शकतो(Easy Palak Butter Chakli For Diwali Faral).

साहित्य :- 

१. तांदुळाचे पीठ - १ कप २. बेसन - ४ टेबलस्पून ३. मिरची - आलं पेस्ट - २ टेबलस्पून ४. तीळ - १ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार ६. पालक प्युरी - १ कप ७. बटर / साजूक तूप - ४ टेबलस्पून ८. तेल - तळण्यासाठी 

कोण म्हणतं बुंदीचा लाडू घरी करणं जमतच नाही ? ही घ्या सोपी रेसिपी - करा बुंदीचे लाडू आता घरी...

दिवाळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक्स ऐवजी द्या ५ थंडगार पेय, दिवाळी होईल खास...

कृती :- 

१. सर्वातआधी एका बाऊलमध्ये तांदुळाचे पीठ, बेसन, मिरची - आलं पेस्ट, तीळ, चवीनुसार मीठ, पालक प्युरी, बटर किंवा साजूक तूप घालून घ्यावे. २. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून व्यवस्थित कणकेसारखे पीठ मळून घ्यावे. ३. पीठ मळून घेतल्यानंतर चकलीच्या साच्यात या पिठाचा गोळा घालून या पिठाच्या चकल्या पाडून घ्याव्यात. 

फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...

आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...

४. आता कढईत तेल घेऊन ते चांगले गरम होऊ द्यावे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात एक एक करुन चकली सोडून घ्याव्यात. ५. चकलीला चांगला खरपूस रंग येईपर्यंत या चकल्या दोन्ही बाजुंनी व्यवस्थित तळून घ्याव्यात. 

आपल्या कुरकुरीत, खमंग स्पिनच बटर चकली खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृती