आपल्यापैकी बऱ्याचजणांचे नवरात्रीचे उपवास सध्या सुरु असतील. उपवास म्हटलं की उपवासाचे अनेक पदार्थ आपल्याला आठवतात. उपवास असला की प्रत्येक घरात उपवासाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. उपवासाला आपण काही मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. या मोजक्याच पदार्थांमध्ये साबुदाणा, बटाटा, दही, दूध, रताळे, राजगिरा (Rajgire ka Thepla) असा अनेक पदार्थांचा समावेश असतो. उपवासाच्या या पदार्थांपैकी काही पदार्थ खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आणि शरीराला पौष्टिक असते(How to make rajgira thepla at home for fasting).
उपवासाचा त्रास होऊ नये, शिवाय उपवासाच्या पदार्थांतून पोषण मिळून त्याचा तब्येतीला फायदा व्हावा या उद्देशाने राजगीरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. उपवास आणि पोषण या दोन्ही गोष्टी एकत्र साधता आल्या तर कधीही उत्तम, आणि ते राजगिरा खाऊन शक्य होऊ शकते. राजगिऱ्यामध्ये भरपूर पोषणमूल्य असतात. यासाठीच्या उपवासाच्या दिवशी राजगिरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत. राजगिऱ्याच्या लाडू, चिक्की, शिरा हे तर आपण उपवासाला खातोच पण यंदाच्या उपवासाला राजगिऱ्याचा पौष्टिक थेपला करुन तर पाहा, त्याचीच सोपी रेसिपी पाहूयात(Easy Rajgira Aaloo Farali Thepla Recipe).
साहित्य :-
१. बटाटे - २ ते ३ (उकडवून घेतलेले)२. हळद - १ टेबलस्पून ३. धणे पूड - १ टेबलस्पून ४. काळीमिरी पूड - १ टेबलस्पून ५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार ७. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ८. जिरे - १ टेबलस्पून९. तेल - १ टेबलस्पून १०. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)११. राजगिऱ्याचे पीठ - १.५ कप पीठ १२. दही - १/२ कप
चव साबुदाणा वड्याचीच पण खायचे मात्र साबुदाणा आप्पे-उपवासाला खा कमी तेलातील चमचमीत पदार्थ...
कृती :-
१. एका बाऊलमध्ये उकडवून घेतलेले बटाटे मॅश करून घ्यावेत. आता त्यात हळद, धणे पूड, काळीमिरी पूड घालावी. त्यानंतर यात पांढरे तीळ, हिरव्या मिरचीची पेस्ट, दही, जिरे, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. २. हे सगळे जिन्नस चमच्याने व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यावेत. त्यानंतर या तयार मिश्रणात राजगिऱ्याचे पीठ घालावे. पीठ घाल्यानंतर कणीक मळतो तसे घट्ट मळून राजगिऱ्याच्या थेपल्यासाठी कणीक मळून तयार करून घ्यावे.
३. आता या कणकेचे छोटे गोळे तयार करून त्याचा एक एक थेपला लाटून घ्यावा. थेपला लाटून झाल्यानंतर त्यावर थोडेसे पांढरे तीळ भुरभुरवून घ्यावेत. ४. एक पॅन घेऊन तेल किंवा तूप लावून हा थेपला मंद आचेवर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा.
राजगिऱ्याचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम राजगिऱ्याचा पराठा आपण दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.