Lokmat Sakhi >Food > उकाड्याने गॅससमोर उभे राहावत नाही? गॅस न पेटवता करा कैरी पुदिना चटकदार चटणी

उकाड्याने गॅससमोर उभे राहावत नाही? गॅस न पेटवता करा कैरी पुदिना चटकदार चटणी

Easy Raw Mango And Mint Chutney Recipe उन्हाळ्यात करा कैरी - पुदिन्याची चटपटीत चटणी, सोपी रेसिपी बनते झटपट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 12:42 PM2023-05-21T12:42:52+5:302023-05-21T12:43:31+5:30

Easy Raw Mango And Mint Chutney Recipe उन्हाळ्यात करा कैरी - पुदिन्याची चटपटीत चटणी, सोपी रेसिपी बनते झटपट..

Easy Raw Mango And Mint Chutney Recipe | उकाड्याने गॅससमोर उभे राहावत नाही? गॅस न पेटवता करा कैरी पुदिना चटकदार चटणी

उकाड्याने गॅससमोर उभे राहावत नाही? गॅस न पेटवता करा कैरी पुदिना चटकदार चटणी

उन्हाळ्यात कैरी खाण्याचा मोह कोणाला आवरत नाही. लहानपणी गावाकडे झाडावरचे कैऱ्या तोंडून, त्यावर मीठ मसाला लावून प्रत्येकाने खाल्ली असेल. चटकदार कैरीचे अनके पदार्थ घरोघरी केले जातात. मुख्य म्हणजे कैरीचे लोणचे, पन्हे व चटणी महाराष्ट्रात आवर्जून केले जातात. कैरी आणि पुदिन्याची चटणी फार फेमस आहे.

जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ हमखास केला जातो. या चटणीमुळे साहजिकच जेवणाची रंगत तर वाढतेच. यासह जिभेला देखील एक नवी चव मिळते. कैरी व पुदिन्याची चटणी कमी साहित्यात झटपट तयार होते. ही चटणी आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. ब्रेकफास्ट किंवा रात्रीच्या जेवणासोबत ही चटणी खूप उत्कृष्ट लागते. चला तर मग या झटपट चटकदार चटणीची कृती पाहूयात(Easy Raw Mango And Mint Chutney Recipe).

कैरी - पुदिन्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

पुदिना - २ कप

कैरी - १

हिरवी मिरची

बडीशेप

हॉटेलवाले करतात तितका परफेक्ट लच्छा पराठा करण्याची पाहा १ सोपी ट्रिक, भरपूर पुडांचा खरपूस पराठा तय्यार!

जिरे

काळे मीठ - चवीनुसार

साधे मीठ - चवीनुसार

या पद्धतीने करा चटणी

सर्वप्रथम, पुदिना साफ करून घ्या, व त्याची पाने चांगली धुवून घ्या. आता पुदिन्याची पानं एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता कैरीचे साल काढून घ्या, व त्यातील कोय बाजूला काढून ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात कैरीचे छोटे तुकडे, पुदिन्याची पानं, व २ चमचे पाणी घालून मिश्रण वाटून घ्या.

भजी फार तेलकट होतात? ४ उपाय - भजी तेल पिणार नाहीत - होतील खमंग

मिश्रण वाटून घेतल्यानंतर त्यात बडीशेप, जिरं, हिरवी मिरची, व अर्धा कप पाणी घालून मिश्रणाची पेस्ट तयार करा. चटणी वाटून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे टेस्टी चटकदार कैरी - पुदिन्याची चटणी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Easy Raw Mango And Mint Chutney Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.