उन्हाळ्यात कैरी खाण्याचा मोह कोणाला आवरत नाही. लहानपणी गावाकडे झाडावरचे कैऱ्या तोंडून, त्यावर मीठ मसाला लावून प्रत्येकाने खाल्ली असेल. चटकदार कैरीचे अनके पदार्थ घरोघरी केले जातात. मुख्य म्हणजे कैरीचे लोणचे, पन्हे व चटणी महाराष्ट्रात आवर्जून केले जातात. कैरी आणि पुदिन्याची चटणी फार फेमस आहे.
जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ हमखास केला जातो. या चटणीमुळे साहजिकच जेवणाची रंगत तर वाढतेच. यासह जिभेला देखील एक नवी चव मिळते. कैरी व पुदिन्याची चटणी कमी साहित्यात झटपट तयार होते. ही चटणी आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. ब्रेकफास्ट किंवा रात्रीच्या जेवणासोबत ही चटणी खूप उत्कृष्ट लागते. चला तर मग या झटपट चटकदार चटणीची कृती पाहूयात(Easy Raw Mango And Mint Chutney Recipe).
कैरी - पुदिन्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
पुदिना - २ कप
कैरी - १
हिरवी मिरची
बडीशेप
जिरे
काळे मीठ - चवीनुसार
साधे मीठ - चवीनुसार
या पद्धतीने करा चटणी
सर्वप्रथम, पुदिना साफ करून घ्या, व त्याची पाने चांगली धुवून घ्या. आता पुदिन्याची पानं एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता कैरीचे साल काढून घ्या, व त्यातील कोय बाजूला काढून ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात कैरीचे छोटे तुकडे, पुदिन्याची पानं, व २ चमचे पाणी घालून मिश्रण वाटून घ्या.
भजी फार तेलकट होतात? ४ उपाय - भजी तेल पिणार नाहीत - होतील खमंग
मिश्रण वाटून घेतल्यानंतर त्यात बडीशेप, जिरं, हिरवी मिरची, व अर्धा कप पाणी घालून मिश्रणाची पेस्ट तयार करा. चटणी वाटून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे टेस्टी चटकदार कैरी - पुदिन्याची चटणी खाण्यासाठी रेडी.