थंड थंड पेय प्यायला असले की उन्हाळाही (summer special recie) कसा सुकर वाटतो. उष्णतेचा त्रास जरा कमी होतो. जेवणाऐवजी मग अशा सरबतांवरच यथेच्छ ताव मारला जातो. आईस्क्रिम, ऊसाचा रस, आमरस, कैरीचं पन्हं, कोकम सरबत, पंजाब की लस्सी हे काही उन्हाळ्याचे पेटंट पदार्थ.. या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय उन्हाळ्याची मजा पुर्ण झाल्यासारखी वाटतच नाही. म्हणूनच तर ही घ्या एक खास रेसिपी. पंजाब स्टाईल लस्सी बनविण्याची यापेक्षा सोपी पद्धत दुसरी कदाचित नसेलच.. ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला फक्त ३ पदार्थ लागणार आहेत.
लस्सी बनविण्याची रेसिपी (Punjabi Lassi Recipe)- पंजाबी स्टाईल लस्सी बनविण्यासाठी आपल्याला दही, साखर आणि बर्फाचे तुकडे एवढंच साहित्य लागणार आहे.- सगळ्यात आधी तर बर्फाचे तुकडे ब्लेंडरने फिरवून क्रश करून घ्या.- त्यानंतर त्यात एक कप दही आणि चवीनुसार साखर टाका.- हे तिन्ही पदार्थ जवळपास १ मिनिट व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.- उभ्या ग्लासमध्ये ही थंडगार लस्सी सर्व्ह करा..- यात तुम्हाला आवडत असेल तर मिरेपूड देखील टाकू शकता.- जर मसाला लस्सी करायची असेल तर याच लस्सीमध्ये मिरेपूड, जिरेपूड आणि चाट मसाला टाकावा.
उन्हाळ्यात लस्सी पिण्याचे फायदे- लस्सीचा सगळ्यात मुख्य घटक म्हणजे दही. त्यामुळेच लस्सी प्यायल्यानंतर पोटात शांत वाटते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो.- उन्हाळ्यात अनेकांना ॲसिडीटीचा त्रास होतो. ॲसिडीटी कमी करण्यासाठी थंडगार लस्सी घेणं फायदेशीर ठरतं. - दह्यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं. त्यामुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास उपयुक्त आहे.- लस्सीमध्ये जर जिरेपूड, मिरेपूड टाकली तर त्याची पाचकता आणखी वाढते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठीही लस्सी पिणं फायद्याचं ठरतं.