Lokmat Sakhi >Food > हिवाळा स्पेशल : घरच्याघरी करा चविष्ट प्रोटीन बार, झटपट सोपी रेसिपी, पोषण भरपूर - राहा तंदुरुस्त

हिवाळा स्पेशल : घरच्याघरी करा चविष्ट प्रोटीन बार, झटपट सोपी रेसिपी, पोषण भरपूर - राहा तंदुरुस्त

Easy Recipe of Protein Bar for Winter : पाहूया थंडीच्या दिवसांत हाडे बळकट राहण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी प्रोटीन बार कसा तयार करायचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 09:40 AM2022-12-08T09:40:13+5:302022-12-08T09:45:01+5:30

Easy Recipe of Protein Bar for Winter : पाहूया थंडीच्या दिवसांत हाडे बळकट राहण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी प्रोटीन बार कसा तयार करायचा..

Easy Recipe of Protein Bar for Winter Special: Homemade Tasty Protein Bars, Quick Easy Recipes, Nutrient Rich - Stay Fit | हिवाळा स्पेशल : घरच्याघरी करा चविष्ट प्रोटीन बार, झटपट सोपी रेसिपी, पोषण भरपूर - राहा तंदुरुस्त

हिवाळा स्पेशल : घरच्याघरी करा चविष्ट प्रोटीन बार, झटपट सोपी रेसिपी, पोषण भरपूर - राहा तंदुरुस्त

Highlightsखजूर आणि मध गोड असल्याने पुन्हा गूळ किंवा साखर घालण्याची आवश्यकता नसते. डब्यात सोबत नेण्यासाठीही हे अतिशय सोयीचे असल्याने मधल्या वेळचा स्नॅक्स म्हणूनही याचा चांगला उपयोग होतो.

थंडीच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने शरीराला जास्त ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या काळात आपण सुकामेवा, तीळ, बाजरी, गूळ असे उष्ण पदार्थ, फळे, भाज्या यांचा जास्त प्रमाणात समावेश करतो. शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून या काळात डिंकाचे, खजूराचे, मेथ्यांचे लाडूही घरोघरी केले जातात. लाडूपेक्षा खायला सोपी आणि भरपूर पोषण देणारी अशी एक गोष्ट आपण घरीच करु शकतो. बाजारात मिळणारे प्रोटीन बार आपण काही वेळा खातो. पण हे खूप महागडे असतात. ते विकत घेण्यापेक्षा घरीच प्रोटीन बार केले तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते खाता येतात. पाहूयात थंडीच्या दिवसांत हाडे बळकट राहण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी प्रोटीन बार कसा तयार करायचा (Easy Recipe of Protein Bar for Winter)...

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

ओटस - १ वाटी
खजूर - १ वाटी
काजू - १ वाटी 
बदाम - १ वाटी 
पिस्ते - पाव वाटी
आक्रोड - अर्धी वाटी 
तीळ - पाव वाटी 
खोबऱ्याचा कीस - अर्धी वाटी
मध - अर्धी वाटी
वेलची पावडर - अर्धा चमचा
तूप - १ चमचा 

(Image : Google)
(Image : Google)

कृती -

१. कढईत बदाम, काजू, पिस्ते, आक्रोड चांगले भाजून घ्या.
२. गार झाल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवा पण थोडे  ओबडधोबड ठेवा.
३. तीळ आणि खोबरे मंद आचेवर परतून घ्या.
४. त्याच कढईत तूप घालून त्यात बिया काढलेला खजूर चांगला परतून घ्या.
५. यामध्ये सुकामेवा पूड आणि तीळ व खोबरे घालून चांगले एकजूव करा. 
६. मध आणि आणखी थोडे तूप घालून वेलची पावडर घाला. 
७. ओटस भाजून त्याची मिक्सरवर बारीक पूड करुन ती या मिश्रणात घाला. 
८. मिश्रण एकजीव झाल्यावर एका ताटात पसरुन घ्या आणि मग त्याच्या एकसारख्या वड्या पाडा. 


टिप -

१. खजूर आणि मध गोड असल्याने पुन्हा गूळ किंवा साखर घालण्याची आवश्यकता नसते. तरी तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही गूळ घालू शकता.   
२. आपल्या आवडीनुसार या बारचे लहान-मोठे तुकडे करु शकतो. डब्यात सोबत नेण्यासाठीही हे अतिशय सोयीचे असल्याने मधल्या वेळचा स्नॅक्स म्हणूनही याचा चांगला उपयोग होतो.

Web Title: Easy Recipe of Protein Bar for Winter Special: Homemade Tasty Protein Bars, Quick Easy Recipes, Nutrient Rich - Stay Fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.