Join us  

हिवाळा स्पेशल : घरच्याघरी करा चविष्ट प्रोटीन बार, झटपट सोपी रेसिपी, पोषण भरपूर - राहा तंदुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2022 9:40 AM

Easy Recipe of Protein Bar for Winter : पाहूया थंडीच्या दिवसांत हाडे बळकट राहण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी प्रोटीन बार कसा तयार करायचा..

ठळक मुद्देखजूर आणि मध गोड असल्याने पुन्हा गूळ किंवा साखर घालण्याची आवश्यकता नसते. डब्यात सोबत नेण्यासाठीही हे अतिशय सोयीचे असल्याने मधल्या वेळचा स्नॅक्स म्हणूनही याचा चांगला उपयोग होतो.

थंडीच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने शरीराला जास्त ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या काळात आपण सुकामेवा, तीळ, बाजरी, गूळ असे उष्ण पदार्थ, फळे, भाज्या यांचा जास्त प्रमाणात समावेश करतो. शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून या काळात डिंकाचे, खजूराचे, मेथ्यांचे लाडूही घरोघरी केले जातात. लाडूपेक्षा खायला सोपी आणि भरपूर पोषण देणारी अशी एक गोष्ट आपण घरीच करु शकतो. बाजारात मिळणारे प्रोटीन बार आपण काही वेळा खातो. पण हे खूप महागडे असतात. ते विकत घेण्यापेक्षा घरीच प्रोटीन बार केले तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते खाता येतात. पाहूयात थंडीच्या दिवसांत हाडे बळकट राहण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी प्रोटीन बार कसा तयार करायचा (Easy Recipe of Protein Bar for Winter)...

(Image : Google)

साहित्य - 

ओटस - १ वाटीखजूर - १ वाटीकाजू - १ वाटी बदाम - १ वाटी पिस्ते - पाव वाटीआक्रोड - अर्धी वाटी तीळ - पाव वाटी खोबऱ्याचा कीस - अर्धी वाटीमध - अर्धी वाटीवेलची पावडर - अर्धा चमचातूप - १ चमचा 

(Image : Google)

कृती -

१. कढईत बदाम, काजू, पिस्ते, आक्रोड चांगले भाजून घ्या.२. गार झाल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवा पण थोडे  ओबडधोबड ठेवा.३. तीळ आणि खोबरे मंद आचेवर परतून घ्या.४. त्याच कढईत तूप घालून त्यात बिया काढलेला खजूर चांगला परतून घ्या.५. यामध्ये सुकामेवा पूड आणि तीळ व खोबरे घालून चांगले एकजूव करा. ६. मध आणि आणखी थोडे तूप घालून वेलची पावडर घाला. ७. ओटस भाजून त्याची मिक्सरवर बारीक पूड करुन ती या मिश्रणात घाला. ८. मिश्रण एकजीव झाल्यावर एका ताटात पसरुन घ्या आणि मग त्याच्या एकसारख्या वड्या पाडा. 

टिप -

१. खजूर आणि मध गोड असल्याने पुन्हा गूळ किंवा साखर घालण्याची आवश्यकता नसते. तरी तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही गूळ घालू शकता.   २. आपल्या आवडीनुसार या बारचे लहान-मोठे तुकडे करु शकतो. डब्यात सोबत नेण्यासाठीही हे अतिशय सोयीचे असल्याने मधल्या वेळचा स्नॅक्स म्हणूनही याचा चांगला उपयोग होतो.

टॅग्स :अन्नपाककृती