Join us  

अळूच्या कंदाचे मस्त चटपटीत चिप्स आणि काप करायची सोपी कृती, खाऊन तर पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:10 PM

 खरंतर अळूचे कंद हे खाण्यास अत्यंत चविष्ट आणि आरोग्यास फायदेशीर असतात . पण हे माहितच नसल्यानं ते बाजारात असूनही आणले जात नाही. अळुचे कंद का खाल्ले पाहिजे हे जर एकदा समजलं तर बाजारातून ते आवर्जुन आणले जातील आणि आवडीनं करुन खाल्ले जातील.

ठळक मुद्देअळूचे कंद का खाल्ले पाहिजे हे जर एकदा समजलं तर बाजारातून आवर्जुन ते आणले जातील आणि करुन खाल्ले जातील.अळूच्या कंदातील प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्यानं हे वय वाढण्याचे परिणाम कमी करतात.

कंदमुळं ही आपल्या आहारात विविधता आणि पौष्टिकता आणतात. अळूचे कंद पावसाळ्यात भाजी बाजारात दिसतात. ही भाजी खूप जुनी असली तरी ती हल्ली लोकांना फारशी माहित नसते . ती कशी करावी हे उमगत नाही आणि ती खावी कशासाठी हेही कळत नाही. खरंतर अळूचे कंद हे खाण्यास अत्यंत चविष्ट आणि आरोग्यास फायदेशीर असतात . हे कंदमुळ पूर्वी फक्त आशियाई देशातच खाल्लं जायचं. पण आता त्याच्यातील गुणांमूळे संपूर्ण जगभरात ते खाल्लं जातं. अळुचे कंद का खाल्ले पाहिजे हे जर एकदा समजलं तर बाजारातून आवर्जुन ते आणले जातील आणि करुन खाल्ले जातील. 

अळूचे कंद का खावेत?

 

  1. अळूचे कंद का खाल्ले पाहिजे हे जर एकदा समजलं तर बाजारातून आवर्जुन ते आणले जातील आणि करुन खाल्ले जातील.

अळूच्या कंदात असलेले स्टार्च हे फायबर सारखंच काम करतात. अळुचे कंद हे कोलेस्ट्रॉल कमी करुन हदयाचं संरक्षण करतात.

2. अळूच्या कंदात पॉलीफिनॉल्स विपुल प्रमाणात असतात. पॉलिफेनॉल्समुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. ट्यूमरसदृश्य पेशीही अळूच्या कंदाच्या सेवनानं कमी होतात.

3 अळूचे कंद आहारात असल्यानं शरीराला तंतुमय घटक मिळतात त्यामुळे पचन तंत्र सुधारतं. शिवाय अन्नाचं पचन करण्यासही ते मदत करतात. पोटात गॅस होणं, मुरडा मारणं, जुलाब यासारख्या पोटाच्या आजारात ही भाजी खाणं खूप उपयुक्त मानलं जातं.

4 अळूच्या कंदात असलेल्या तंतूमय घटकाचा उपयोग अनेक कारणांसाठी होतो. या तंतुमय घटकांमुळेच अळुचे कंद हे वजन कमी करण्यासाठी खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात.

5 रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी इ आणि क जीवनसत्त्वं आवश्यक असतात. अळुच्या कंदात हे दोन्ही जीवनसत्त्वं असतात.

6 अळूच्या कंदात ई जीवनसत्त्व आणि मॅग्नेशिअम असतं.स्नायुंची बांधणी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते.

7 अँण्टिऑक्सिडण्टस आणि दाहविरोधी गूण असल्यानं डोळ्यांची काळजी घेण्यासाठी अळूचे कंद खाणं लाभदायक ठरतं. यात अ आणि क जीवनसत्त्वं, झिंक सारखे पोषक घटक असाल्यानं दृष्टी सुधारण्याचं कामही ही भाजी करते.

8 अळूच्या कंदात असलेले तंतुमय घटक पोटात गेल्यानं पचन प्रक्रियेचा वेग कमी होतो. त्यामुळे शरीरास यातून ऊर्जा मिळते. थकवा कमी होतो.

9 रोगप्रतिकारशक्तीसाठी अळूच्या कंदातील अँण्टिऑक्सिडण्टस, अ आणि क जीवनसत्त्वं, महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अळूच्या कंदामुळे शरीरात निर्माण होऊ होणार्‍या मुक्त मुलकांचा प्रतिरोध होतो. हे मुक्त मूलक अनेक विकारांचं कारण ठरतात.

10 वय वाढतं त्याचा परिणाम शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे होतो. अळूच्या कंदातील प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्यानं हे वय वाढण्याचे परिणाम कमी करतात.

 

अळूच्या कंदाचे चविष्ट पर्यायअळूचे कंद हे पौष्टिक हे असतात हे खरं आहे. पण अळूच्या कंदाचे पदार्थ करताना ते नीट शीजले किंवा तळले गेले आहेत ना याची काळजी घ्यावी लागते. अळूचे कंद हे अर्धे कच्चे स्वरुपात शिजवून खाल्ले तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

अळूकंद फ्राय हा पदार्थ करण्यासाही अर्धा किलो अळूचे कंद, दोन चमचे तेल आणि तेल घ्यावं.सर्वात आधी अळूचे कंद स्वच्छ करावेत, त्याची सालं सोलून टाकावीत. त्याचे लांब आणि पातळसर काप करावेत. कढईत दोन चमचे तेल गरम करावं. तापलेल्या तेलात अळूच्या कंदाचे काप टाकावेत. ते तपकिरी रंगावर येईपर्यंत परतावे जास्तीचं तेल निथळून घ्यावं. या तयार फ्राय कापांवर मीठ टाकून खावं. अशा रुचकर प्रकारे अळूचे कंद खाता येतात.

अळूकंदाचे वेफर्स अर्धा किलो अळूकंद, दोन मोठे चमचे ऑलिव्ह तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावं. अळूचे कंद स्वच्छ करुन त्याची सालं काढून घ्यावीत. त्याचे बारीक काप करावेत. प्रत्येक काप ऑलिव्ह तेलात बुडवून घावेत. तेलात बुडवून कोट केलेले तुकडे बेकींग शीटवर ठेवून ते ओव्हनमधे 204 अंश सेल्सिअसवर 20 मिनिटं ठेवावे. ते बाहेर काढल्यानंतर त्यावर मीठ भुरभुरावं.