हिवाळ्यात बाजारात सगळ्याच भाज्या एकदम ताज्या आणि स्वस्त मिळतात. या हिरव्यागार फ्रेश भाज्या पाहून त्या खाव्याशा वाटतात. थंडीच्या दिवसात बाजारात ठेल्यांवर हिरव्यागार मटारचे ढिग लावून ठेवलेलं आपण बघतो. हे मटार आपण विकत आणून त्याच्या मटार पनीर, मटार पराठा, मटार उसळ असे वेगवेगळे चविष्टय पदार्थ करतो. आपल्यापैकी कित्येकजणी हे मटार होलसेल भावात आणून मग ते सोलून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतात. पटकन काहीतरी बनवायचे असल्यास किंवा घरात काही भाजी नसेल तर अशा वेळी आपण हे फ्रिजमध्ये स्टोअर केलेले मटार वापरू शकतो. मटार आपल्याला वर्षभर उपलब्ध नसतात ते हिवाळ्यातच मिळतात. यासाठी आपलं हे मटार फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवतो. हे मटार योग्य पद्धतीने स्टोअर केल्यास ते वर्षभर चांगले राहतात फक्त ते स्टोअर करताना त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. मटार स्टोअर करून ठेवल्यास ते वर्षभर चांगले टिकवण्यासाठी एक सोपा उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. मटार वर्षभर टिकवून ठेवण्यासाठीचा हा नेमका उपाय काय आहे ते समजून घेऊयात(How To Store Matar (Green Peas) Preserve For 1 Year).
नक्की काय करता येऊ शकत?
foodielalita या इंस्टाग्राम पेजवरून मटार वर्षभरासाठी कसे स्टोअर करून ठेवावेते याचा सोपा उपाय सांगितला आहे.
१. मटार निवडून घ्या. २. निवडून घेतलेले मटारचे दाणे एका बाऊलमध्ये ठेवा. ३. एका भांड्यात गरम पाणी घेऊन ते उकळवून घ्या. ४. या उकळत्या पाण्यात १ टेबलस्पून मीठ आणि साखर घालून घ्यावे. मीठ आणि साखरेमुळे मटारचा हिरवा रंग वर्षभर तसाच टिकून राहील. ५. या गरम पाण्यात हे मटार २ मिनिटे उकळवून घ्यावेत. ६. त्यानंतर एका भांड्यात थंड पाणी घ्या. ७. गरम पाण्यात उकळवून घेतलेले मटार लगेच काढून थंड पाण्याच्या बाऊलमध्ये घालावे. ८. थंड पाण्यात मटार नॉर्मल तापमानाला येऊ द्यात. ९. त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडावर हे मटार ओता. १०. या कापडावर हे मटार सुकू द्यात. ११. हे मटार संपूर्णपणे सुकल्यावर एका प्लॅस्टिकच्या झिप लॉक बॅगमध्ये भरून फ्रिजमध्ये रेफ्रिजरेट करून ठेवा. १२. प्लॅस्टिकच्या झिप लॉक बॅगमध्ये भरून ठेवताना संपूर्ण बॅग न भरता बॅग अर्धवट भरून घ्या.
अशा प्रकारे हिवाळ्यात स्वस्त मिळणारे मटार तुम्ही स्टोअर करून पुढील वर्षभरासाठी वापरू शकता.