Lokmat Sakhi >Food > घरी ढाबास्टाईल डाळ - खिचडी करता येत नाही? कुकरमध्ये द्या फोडणी, ढाब्यावरची चव येईल नक्की

घरी ढाबास्टाईल डाळ - खिचडी करता येत नाही? कुकरमध्ये द्या फोडणी, ढाब्यावरची चव येईल नक्की

Easy rice recipe | How to make Dhaba Style Dal khichdi चपाती - भाजी नेहमीचीच, डिनरला करा ढाबास्टाईल डाळ - खिचडी, चवीला भारी - पचायला हलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2023 05:40 PM2023-08-02T17:40:45+5:302023-08-02T17:51:42+5:30

Easy rice recipe | How to make Dhaba Style Dal khichdi चपाती - भाजी नेहमीचीच, डिनरला करा ढाबास्टाईल डाळ - खिचडी, चवीला भारी - पचायला हलकी

Easy rice recipe | How to make Dhaba Style Dal khichdi | घरी ढाबास्टाईल डाळ - खिचडी करता येत नाही? कुकरमध्ये द्या फोडणी, ढाब्यावरची चव येईल नक्की

घरी ढाबास्टाईल डाळ - खिचडी करता येत नाही? कुकरमध्ये द्या फोडणी, ढाब्यावरची चव येईल नक्की

सर्वत्र फास्टफूडचा बोलबाला जरी असला तरी, काही पौष्टीक घरगुती पदार्थांना आजही तितकीच पसंती मिळते. चपाती भाजी तर रोजचीच, पण डाळ खिचडीचा देखील खवय्यावर्ग फार मोठा आहे. दिवसभर थकल्यानंतर दातांना देखील विश्रांती हवी, नाही का? किंवा अनेकदा जेवण बनवण्याचा देखील कंटाळा येतो. अशावेळी आपण झटपट डाळ खिचडी तयार करू शकतो.

डाळ खिचडी ही रेसिपी फार कठीण नाही, योग्य प्रमाणात साहित्य घेतल्यास ही रेसिपी झटपट तयार होते. परंतु, अनेकदा ही रेसिपी घरी ढाबास्टाईल तयार होत नाही. कधी डाळ कमी पडते, तर कधी भात नीट शिजत नाही, किंवा मसाले कमी पडतात. जर आपल्याला कुकरमध्ये झटपट ढाबास्टाईल डाळ खिचडी तयार करायची असेल तर, ही कृती नक्की फॉलो करून पाहा(Easy rice recipe | How to make Dhaba Style Dal khichdi).

डाळ खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

मुग डाळ

मसूर डाळ

तेल

जिरं

मोहरी

आलं - लसूण पेस्ट

हळद

कांदा

कडीपत्ता

टोमॅटो

पापड कांद्याची चटणी - पावसाळ्यात त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर करा ही झटपट चमचमीत चटणी

हिरवी मिरची

मीठ

तूप

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप तांदूळ, एक कप मुग डाळ, अर्धा कप मसूर डाळ घ्या. त्यात पाणी घालून डाळ - तांदूळ धुवून घ्या. दुसरीकडे प्रेशर कुकरमध्ये २ टेबलस्पून तेल घाला, त्यात एक चमचा जिरं, एक चमचा मोहरी, आलं - लसूण पेस्ट, चिमुटभर हळद, बारीक चिरलेला कांदा, ४ ते ५ कडीपत्त्याची पानं घालून कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, व हिरवी मिरची घालून साहित्य मिक्स करा.

इडलीसाठी डाळ-तांदूळ भिजवताना त्यात घाला १ पांढरीशुभ्र ‘सिक्रेट’ गोष्ट, इडली होईल मऊ-हलकी

कांदा - टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्यात डाळ - तांदूळ घालून मिक्स करा. व चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा. नंतर त्यात दीड कप पाणी आणि तूप घालून चमच्याने मिक्स करा. त्यावर कुकरचं झाकण लावून, खिचडी शिजवून घ्या. अशा प्रकारे ढाबास्टाईल डाळ - खिचडी खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Easy rice recipe | How to make Dhaba Style Dal khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.