Lokmat Sakhi >Food > कपभर रव्याचे करा ५० पळी पापड, तेलात फुलतात दुप्पट; करायला सोपे-टिकतात भरपूर

कपभर रव्याचे करा ५० पळी पापड, तेलात फुलतात दुप्पट; करायला सोपे-टिकतात भरपूर

Easy Sooji Papad Recipe/Semolina Papad : पापड लाटण्यात आणि कुरडई पाडण्यात वेळ घालवायचा नसेल तर, एकदा रव्याचे पळी पापड करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2024 10:10 AM2024-03-30T10:10:20+5:302024-03-30T10:15:02+5:30

Easy Sooji Papad Recipe/Semolina Papad : पापड लाटण्यात आणि कुरडई पाडण्यात वेळ घालवायचा नसेल तर, एकदा रव्याचे पळी पापड करून पाहा..

Easy Sooji Papad Recipe/Semolina Papad | कपभर रव्याचे करा ५० पळी पापड, तेलात फुलतात दुप्पट; करायला सोपे-टिकतात भरपूर

कपभर रव्याचे करा ५० पळी पापड, तेलात फुलतात दुप्पट; करायला सोपे-टिकतात भरपूर

उन्हाळा सुरु होताच, महिलावर्ग वाळवणाला लागतात. कुरडई, पापड, पळी पापड, पोंगे यासह इतर प्रकार आवर्जून केले जातात. काही महिला पापड लाटण्यात आणि कुरडई पाडण्याचा कंटाळा करतात (Papad Recipe). जर आपल्याला मेहनत न घेता कुरकुरीत पापड तयार करायच्या असतील तर, ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे (Cooking Tips). पळी पापड विविध प्रकारचे केले जातात.

काही लोक बटाटा, साबुदाणे आणि तांदुळाचे पळी पापड तयार करतात. पण आपण कधी रव्याचे पळी पापड करून पाहिलं आहे का? रव्याचा उपमा, शिरा आपण करतोच, पण एकदा पळी पापड करून पाहा. हे पापड तळताच दुप्पट फुलतात. शिवाय कमी वेळात-कमी मेहनत घेता तयार होतात. रव्याचे पळी पापड करण्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. दुप्पट फुलणारे क्रिस्पी पळी पापड कसे तयार करायचे? पाहा(Easy Sooji Papad Recipe/Semolina Papad).

पळी पापड करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

पाणी

जिरं

'वो स्त्री है...' महिलेने सांगितलं साडी सावरत बस कशी पकडायची? नेटकरी म्हणाले..

पापड खार

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक मोठा कप रवा घ्या. त्यात २ कप पाणी घालून रवा धुवून घ्या. नंतर त्यात एक कप पाणी घालून मिक्स करा. दुसरीकडे कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात ७ वाटी पाणी घाला, आणि मध्यम आचेवर गॅस ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापड खार घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेला रवा घालून मिक्स करा, व मध्यम आचेवर चमच्याने ५ मिनिटांसाठी ढवळत राहा. मिश्रणाला घट्टपणा आल्यानंतर गॅस बंद करा, व त्यात एक चमचा जिरं घालून मिक्स करा. २ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा.

डाळ-तांदूळ कशाला? कपभर सोया चंक्स घ्या अन् वेट लॉस डोसा करा! क्रिस्पी डोसा-१० मिनिटात

आता प्लास्टिक पेपरला थोडे तेल लावा. त्यावर चमच्याने थोडे रव्याचे मिश्रण ओतून पसरवा. कडकडीत उन्हात २ दिवसांसाठी हे पापड वाळत घाला, दोन्ही बाजूने वाळल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा प्रकारे रव्याचे पळी पापड रेडी. जेव्हा खायची इच्छा झाल्यास आपण हे पापड तेलात तळून खाऊ शकता. रव्याचे हे पळी पापड तेलात तळताच दुप्पट फुलतात, शिवाय चवीला क्रिस्पीही लागतात.

Web Title: Easy Sooji Papad Recipe/Semolina Papad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.