Join us  

ना वाटण - ना झंझट, कपभर सोया चंक्सची करा चमचमीत भुर्जी; १० मिनिटात प्रोटीन रिच डिश रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2024 12:29 PM

Easy Soya Bhurji Recipe | High protein Food : रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा चवदार सोया चंक्सची भाजी करून पाहा..

सोयाबीन प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे (Soya Chunks). प्रोटीनबरोबरच त्यात व्हिटामिन्स आणि इतर खनिजे आढळतात. जर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर, आहारात सोयाबीन वड्यांचा समावेश नक्कीच करा. सोयाबीन वड्यांची भाजी, ग्रेव्ही भाजी, सोयाबीन पुलाव, सोयाबीन कटलेट आपण खाऊन पहिलंच असेल (Protien Food). पण आपण कधी सोयाबीन भुर्जी खाऊन पाहिली आहे का?

सोयाबीन भुर्जी करायला सोपी व चवीला भन्नाट लागते (Cooking Tips). जर आपल्याला रोजची भाजी, पालेभाज्या, आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर, हॉटेलस्टाईल सोयाबीन भुर्जी एकदा करून पाहाच. सोयाबीन न खाणारेही आवडीने खातील. शिवाय आरोग्याला फायदेच फायदे मिळतील. सोयाबीन भुर्जी कशी तयार करायची पाहूयात(Easy Soya Bhurji Recipe | High protein Food).

सोया चंक्स भुर्जी करण्यासाठी लागणारं साहित्य

सोया चंक्स

तेल

२ बटाटे-कपभर रवा, चमचाभर तेलामध्ये करा बटाट्याचे अप्पे; १० मिनिटात क्रिस्पी नाश्ता रेडी

जिरं

लसूण

कांदा

हिरवी मिरची

टोमॅटो

धणे पूड

जिरे पूड

मीठ

लाल तिखट

कृती

सर्वप्रथम, एका कढईत २ कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चिमुटभर मीठ घाला. नंतर त्यात सोया चंक्स घाला. नंतर गॅस बंद करा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. १० मिनिटानंतर भिजेलेले सोया चंक्स एका बाऊलमध्ये काढून घ्या.

टिपिकल गुजराथी पद्धतीचा पारंपरिक खमण ढोकळा खायचाय? करा फक्त १५ मिनिटांत, पाहा रेसिपी

त्यात थंड पाणी ओतून सोया चंक्समधलं पाणी हाताने दाबून काढून घ्या. नंतर भिजलेले सोया चंक्स मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्या. दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून साहित्य भाजून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा धणे पूड, जिरे पूड, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा.

साहित्य मिक्स केल्यानंतर त्यात वाटलेलं सोया चंक्स घालून मिक्स करा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे चमचमीत सोया चंक्स भुर्जी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स