Join us  

पालकाची भाजी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग - कुरकुरीत पालकाची वडी, चव अशी करेल दिल खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2023 4:05 PM

Easy Spinach Snack Recipe: How To Make Crispy Palak Vadi आजच बनवा महाराष्ट्रीयन स्टाईल हेल्दी पालकाची वडी, पालक न खाणारेही चवीने खातील..

पालक कोणाला आवडते तर कोणाला नाही. पालकाचे अनेक पदार्थ बनवले जातात. पालक पनीर, पालक भाजी, पालक भजी, पालक पराठे, पालक पुरी इत्यादी पदार्थ करण्यात येते. पालक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पालकमध्ये एंटी-ऑक्सीडेंट्स आहेत.

तसेच त्यामध्ये कॅल्शियम, सोडियाम, कलोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज प्रोटीन, आयर्न, विटामीन सी, विटामीन ए भरपूर मात्रामध्ये आढळते. आपण पालकाचे वडी देखील बनवू शकता. पालकाच्या वड्या बनवायला सोपे आहे. आपण हा पदार्थ साईड डिश म्हणून देखील खाऊ शकता. कमी साहित्यात कमी वेळात ही रेसिपी बनते. चला तर मग या खमंग कुरकुरीत पदार्थाची कृती पाहूयात.

पालकाची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

पालक

हिरवी मिरची

लसूण

आलं

धणे

जिरं

पांढरे तीळ

उन्हाळ्यात करा कच्च्या करवंदाची चटकदार चटणी, कमी साहित्यात, बनते झटपट

ओवा

मिरची पावडर

हळद

मीठ

तेल

बेसन

तांदळाचे पीठ

या पद्धतीने बनवा खमंग पालकाची वडी

सर्वप्रथम, पालक चांगले धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, धणे, जिरं घालून ठेचा वाटून घ्या. मिश्रण वाटून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या पालकमध्ये मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात पांढरे तीळ, ओवा, लाल तिखट, हळद व मीठ घालून मिश्रण चांगले हाताने  मिक्स करा. आता एक मोठा टेबलस्पून तेल, एक कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ घालून मिश्रण हाताने मळून घ्या.

मिश्रण मळून झाल्यानंतर हाताला थोडे तेल लावून ग्रीस करा. व पिठाला लांबट गोलाकार द्या. इडलीच्या भांड्यात किंवा वाफेवर तयार पालकाच्या मिश्रणाला वाफवून घ्या. पालकाचे मिश्रण वाफवून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा, व त्यानंतर त्याची वडी कापून घ्या.

तिळाची परफेक्ट चटणी करण्याची रेसिपी, कमी वेळात-कमी साहित्यात करा चटकदार चटणी

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात पालकाचे वडी तळून घ्या. अशा प्रकारे पालकाचे खमंग, कुरकुरीत वडी खाण्यासाठी रेडी. आपण हा पदार्थ जेवणासोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.