Lokmat Sakhi >Food > संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा चटपटीत ‘सुशिला’; चुरमुऱ्यांपासून तयार होणारा चविष्ट पदार्थ...

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा चटपटीत ‘सुशिला’; चुरमुऱ्यांपासून तयार होणारा चविष्ट पदार्थ...

Easy Tasty Sushila Recipe from rice puff : मटकी भेळ, ओली भेळ, कोरडी भेळ या पदार्थांपेक्षा वेगळा असा चमचमीत सुशिला एकदा खाऊन तर पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 06:26 PM2023-10-16T18:26:29+5:302023-10-16T18:27:56+5:30

Easy Tasty Sushila Recipe from rice puff : मटकी भेळ, ओली भेळ, कोरडी भेळ या पदार्थांपेक्षा वेगळा असा चमचमीत सुशिला एकदा खाऊन तर पाहा...

Easy Tasty Sushila Recipe from rice puff : Try the tangy 'Sushila' for an evening snack; A delicious dish made from churmure... | संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा चटपटीत ‘सुशिला’; चुरमुऱ्यांपासून तयार होणारा चविष्ट पदार्थ...

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा चटपटीत ‘सुशिला’; चुरमुऱ्यांपासून तयार होणारा चविष्ट पदार्थ...

नाश्त्यासाठी किंवा अधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी रोज वेगळं काय बनवायचं असा प्रश्न महिलांनासतत पडतो. मग संध्याकाळची वेळ असेल तर भजी, वडे, भेळ, भडंग असे काही ना काही चटपटीत केले जाते. पण भेळ किंवा भडंग खाण्याचा कंटाळा आला असेल तर एक चुरमुऱ्यांपासून करता येईल असा एक सोपा आणि आगळावेगळा पदार्थ आज आपण पाहणार आहोत. हा पदार्थ पौष्टीक असून चविष्ट असल्याने लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल असा आहे. त्यामुळे काहीतरी चटपटीत आणि आरोग्याला हानिकारक असे काही खाण्यापेक्षा थोडे वेगळे काही खाल्ले तर तोंडालाही छान चव येते. मटकी भेळ, ओली भेळ, कोरडी भेळ या पदार्थांपेक्षा वेगळा असा चुरमुऱ्यापासूनच केला जाणारा सुशीला हा पदार्थ कसा करतात पाहूया (Easy Tasty Sushila Recipe from rice puff)...

साहित्य -

१. चुरमुरे - ३ वाट्या 

२. कांदा - बारीक चिरलेला १ वाटी 

३. डाळं - पाव वाटी

४. दाणे - पाव वाटी

५. फोडणीसाठी - तेल, मोहरी, जीरं, हिंग, हळद

६. हिरव्या मिरच्या - २ ते ३

७. कडीपत्ता - ८ ते १० पाने 

८. मीठ - चवीनुसार 

९. कोथिंबीर - बारीक चिरलेली पाव वाटी 

कृती  -

१. डाळं आणि दाणे आवडीप्रमाणे कुटून किंवा मिक्सरमध्ये ओबडधोबड बारीक करुन घ्यायचे. नसतील आवडत तर तसेच ठेवले तरी चालतात.

२. चुरमुरे पाण्यात घालायचे आणि अगदी एखाद मिनीट पाण्यात ठेवून त्यातले पाणी निथळून काढून घघ्यायचे. 

३. कढईमध्ये २ चमचे तेल घालून त्यात मोहरी, जीरं, हिंग घालून मोहरी चांगली गरम होऊ द्यायची. 

४. या फोडणीत बारीक चिरलेल्या मिरच्या, कडीपत्ता आणि कांदा घालून हे सगळे फोडणीत चांगले परतून घ्यायचे. मिरची नको असेल तर आवडीप्रमाणे लाल तिखट घातले तरी चालते. 

५. फोडणीत सगळ्यात शेवटी हळद घालून मग त्यामध्ये ओलसर केलेले चुरमुरे घालायचे. 

६. याम चणा डाळ आणि दाण्याची भरड आणि मीठ घालून सगळे डावाने चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

७. झाकण ठेवून साधारण ५ मिनीटे एक वाफ काढून घ्यायची. 

८. त्यानंतर डीशमध्ये घेतल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सोबत एक लिंबाची फोडही द्यायची. पोहे किंवा भेळ यांना हा थोडा वेगळा पर्याय नक्कीच ठरु शकतो. 


 

Web Title: Easy Tasty Sushila Recipe from rice puff : Try the tangy 'Sushila' for an evening snack; A delicious dish made from churmure...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.