काही दिवसांतच नवरात्र (Navratri Special Recipe) सणाला सुरुवात होईल. सगळीकडे नवरात्र उत्सवाची अगदी धुमधाम व जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. नवरात्रांत इतर तयारी सोबतच आपण उपवासाची देखील खास तयारी करतो. खास करून जे लोक नऊ दिवस उपवास करणार असतात ते उपवासाला नऊ दिवस नेमके काय खायचे याच्या तयारीला लागले असतील. उपवासा दरम्यान आपण साबुदाणा व त्यापासून बनलेले इतर पदार्थ खाण्याला जास्त प्राधान्य देतो. साबुदाण्याची खिचडी, खीर, वडे, थालीपीठ असे असंख्य उपवासाचे पदार्थ आपण नेहमीच खातो. परंतु काहीवेळा हे उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन अतिशय कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळं खावंसं वाटत(Sabudana Barfi Recipe).
उपवास म्हटला की साबुदाणा (Sago Burfi Recipe) हा सगळ्यांत मुख्य पदार्थ असतोच. नऊ दिवस सलग हे उपवास केल्याने काहीवेळा आपल्याला थकवा येतो. अशावेळी काहीतरी इन्स्टंट ताकद मिळवून देणारे पदार्थ खावेसे वाटतात. परंतु उपवास असल्याने आपल्या खाण्यावर काही मर्यादा येतात. कारण उपवासा दरम्यान आपण काही ठराविकच पदार्थ खाऊ शकतो. यासाठीच उपवासा दरम्यान एनर्जी बूस्ट करणारे व थकवा घालवणारे पदार्थ खावेत. साबुदाण्याचा वापर करून आपण झटपट होणारी साबुदाणा बर्फी करु शकतो. ही गोड बर्फी तोंडात टाकताच आपल्याला तिच्या गोडव्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळू शकेल(How To Make Sabudana Barfi At Home).
साहित्य :-
१. साबुदाणा - १ कप
२. साखर - १ कप
३. दूध - अर्धा लिटर
४. साजूक तूप - ५ ते ६ टेबलस्पून
६. वेलची पावडर - १/४ टेबलस्पून
८. ड्रायफ्रुटस काप - २ ते ३ टेबलस्पून (काजू, बदाम, पिस्ता किंवा आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स)
९. दुधावरची होममेड मलई - १ टेबलस्पून
नवरात्र स्पेशल : साबुदाणा व भगर वापरून चटकन बनवा उपवासाचा डोसा, खायला कुरकुरीत, बनवायला सोपा...
कृती :-
१. सर्वातआधी साबुदाणे पाण्यांत हलकेसे भिजवून घ्यावेत, हे भिजवलेले साबुदाणे एका नॅपकिनवर काढून त्यातील अधिक पाणी काढून घ्यावे. २. त्यानंतर एक कढई घेऊन त्यात साबुदाणे कोरडे भाजून घ्यावेत.
३. साबुदाणे कोरडे भाजून घेतल्यानंतर ते थंड होण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घ्यावेत.
४. थंड झाल्यानंतर हे साबुदाणे मिक्सरमध्ये वाटून त्याचे बारीक पीठ करून घ्यावे. वाटून घेतलेले पीठ चाळणीतून चाळून घ्यावे.
गाजर न किसता अगदी १० मिनिटांत करा टेस्टी झटपट गाजर हलवा, जिभेवर ठेवताच अलगद विरघळेल असा स्वाद...
५. आता एक कढई घेऊन त्यात हे पीठ भाजून घ्यावे, पीठ भाजून घेताना त्यात गरजेनुसार समप्रमाणात तूप घालावे.
६. दुसरीकडे एका भांड्यात दूध घेऊन ते गरम करावे व त्यात साखर घालून ती संपूर्णपणे विरघळवून घ्यावी.
७. त्यानंतर दूध थोडे आटवून घ्यावे हे आटवलेले दूध नंतर हळूहळू गरजेप्रमाणे साबुदाण्याच्या पिठामध्ये घालत राहावे.
८. आता या मिश्रणात होममेड दुधावरची मलई घालून घ्यावी.
९. सगळ्यात शेवटी वेलची पूड व तूप घालून घ्यावे.
१०. आता एका थाळीला तूप लावून ग्रीस करून घ्यावे, मग यात हे बर्फीचे मिश्रण ओतावे व वरून ड्रायफ्रुटसचे काप भुरभुरवून घ्यावे.
११. त्यानंतर या बर्फीचे काप पाडून घ्यावेत.
उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...
आपली उपवासाची साबुदाण्याची बर्फी खाण्यासाठी तयार आहे.