Join us  

करुन पाहा वांग्यांचं रायतं; वांग्याचं भरीत आणि वांग्याची कापं विसराल असा मस्त चमचमीत पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 9:00 AM

Easy To Make & Delicious To Eat Homemade Brinjal Raita Recipe : वांग्यांचं रायतं करायला अगदी सोपं आणि साध्या जेवणाचीही वाढते रंगत

वांग म्हटलं की काहीजणांना ते फार आवडते तर काहीजण नाव ऐकूनच नाक मुरडतात. आपल्याकडे वांग्याचे अनेक पदार्थ केले जातात. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी, सुकी भाजी असे असंख्य प्रकार बनवले जातात. वांग्यामध्ये कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम आणि इतर पौष्टिक घटक अधिक प्रमाणात असतात. असे हे भरपूर हेल्दी वांग खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. 

दररोजच्या जेवणामध्ये सततच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो, त्यामुळे काही नवीन विशेष पदार्थ तयार करून खावं असे वाटते. अशावेळी आपण अत्यंत सोपे व कमी वेळात झटपट होणारे वांग्याचे रायतं करून तोंडी लावायला म्हणून खाऊ शकतो. साहसा आपल्याकडील कोशिंबीर किंवा रायतं म्हटलं की त्यात दही हे ओघाने आलंच. वांग्याचे हे रायतं चवीला फारस तिखट नसल्याने घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. वांग्याचं रायतं बनवण्याची सोपी कृती पाहूयात(Easy To Make & Delicious To Eat Homemade Brinjal Raita Recipe).

साहित्य :- 

१. आकाराने मोठे असलेलं वांग - १ २. कांदा - १ कप (बारीकी चिरलेला)३. शेंगदाण्याचा कूट - २ टेबलस्पून४. मीठ - चवीनुसार ५. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)६. दही - ३ ते ४ टेबलस्पून ७. हिरवी मिरची - १ ते २ (बारीक चिरलेली)८. तेल - १ ते २ टेबलस्पून ९. राई - १ टेबलस्पून १०. कडीपत्ता - ४ ते ५ पाने ११. हिंग - चिमूटभर 

फक्त १० मिनिटांत फ्रिजमध्ये करून ठेवा ४ प्रकारची वाटणं, रोजचा स्वयंपाक होईल चमचमीत - झटपट...

फोडशीची रानभाजी खायला नाक मुरडणारे देखील फोडशीची भजी चवीने खातील, चमचमीत व पौष्टिक रेसिपी... 

कृती :- 

१. सर्वप्रथम वांग्याला थोडेसे तेल लावून घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर सगळ्या बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. २. वांग खरपूस भाजून घेतल्यानंतर त्यावरची साल निघाली की ती काढून घ्यावी. ३. वांग्याची साल काढून घेतल्यानंतर हे वांग एका भांड्यात काढून मॅश करून घ्यावे. ४. वांग मॅश करून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

५. हे सगळे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावे. ६. आता एका छोट्या भांड्यात तेल किंवा तूप घेऊन त्यात राई, कडीपत्ता, हिंग यांची फोडणी द्यावी. ७. ही खमंग फोडणी या वांग्याच्या तयार रायत्यात ओतून घ्यावी. ८. सगळ्यात शेवटी ही फोडणी रायत्यात संपूर्णपणे मिक्स होण्यासाठी चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावी. 

विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...

आपले वांग्याचे झटपट तयार होणारे खमंग रायते खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती