रोजच्या जेवणात चपाती (Chapati) नसते असं एकही घर सापडणार नाही. चपात्या प्रत्येक घरांमध्ये खाल्ल्या जातात. चपाती करणं म्हणजे एक मोठा टास्क असतो. चपातीचं पीठ मळा, चपात्या लाटा त्यानंतर शेकणं या सगळ्यात बराचवेळ जातो. चपाती करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. (How To Make Chapati Without Kneading) इतकं करून ही जर चपाती व्यवस्थित झाल्या नाही तर जेवणाचा आनंद घेता येत नाही. तर तुम्हाला रोज पीठ मळण्याचा किंवा चपात्या लाटण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा न लाटता अगदी सोप्या पद्धतीने चपात्या करू शकता. (How To Make Chapati In Easy Way)
सोप्या पद्धतीने चपाती कशी बनवाल? (Wheat Flour Roti With Liquid Batter)
सगळ्यात आधी एका भांड्यात चपातीचं पीठ घ्या. त्या अर्धा चमचा मीठ घाला. तुम्ही गव्हाच्या पीठात मैदा घालायचा असेल तर घालू शकता. यात पाणी घालून एक पातळ मिश्रण तयार करा. डोश्याच्या पिठाप्रमाणे हे मिश्रण असायला हवं. १ कप गव्हाच्या पीठासाठी १ कप पाणी घाला. चपातीचं पीठ व्यवस्थित मिसळून घ्या. जर तुमची चपाती गोल बनत नसेल किंवा चपाती फुगत नसेल तर ही रेसेपी नक्की उपयोगी ठरेल. (How To Make Roti Without Rolling Pin)
गव्हाच्या पीठात २ कप अजून पाणी घाला. म्हणजेच तुम्ही पीठ मळायला जितकं पाणी घेता त्यापेक्षा तीन पट जास्त पाणी तुम्हाला लागेल. पाणी घातल्यानंतर चमच्याच्या साहय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. यात १ चमचा तेल घाला. ज्यामुळे चपात्या मऊ होतात. तेल नको असेल तर तुम्ही तेल घालणं टाळू शकता.
ढेरी दिसते-कंबर जाड वाटतं? डॉक्टरांनी सांगितल्या ३ टिप्स; ७ दिवसांत वजन होईल कमी
नॉनस्टिक तवा मध्यम ते उच्च आचेवर गरम करून घ्या. तव्यात थोडं तेल घालून सर्व मिश्रण पसरवून घ्या. नंतर त्यावर चपातीचं पीठ घालून पुन्हा मिश्रण पसरवून घ्या. एका बाजूनं शिजल्यानंतर चपाती दुसऱ्या बाजूने शिजवून घ्या. २ ते ३ वेळा पलटी केल्यानंतर चपाती शिजलेली असेल. अशाच पद्धतीने बाकीच्या चपात्याही करून घ्या.