हिवाळा (Winter Special Laddoo) सुरु झाल्यानंतर लाडवाचा सिझन देखील सुरु होतो. थंडीत शरीराला उब मिळावी, यासह हिवाळ्यातील आजार दूर राहावे यासाठी पौष्टीक लाडू खाल्ले जातात. मेथी, डिंक, ड्रायफ्रुट्स यासह तिळाचे लाडू देखील खाल्ले जातात. तिळाचे लाडू खायला चविष्ट असतात. काही गृहिणी तिळाचे लाडू मकर संक्रातीनिमित्त करतात. पण आपण हे लाडू कोणत्याही ऋतूत खाऊ शकता.
तिळाचे लाडू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Sesame Laddoo). तिळात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन बी आणि ई आढळतात (Cooking Tips). हे सर्व घटक डोळे, यकृत आणि इतर अवयवांसाठी फायदेशीर ठरतात. शिवाय हे लो कॅलरी फूड असल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. चला तर मग तिळाचे पौष्टीक लाडू कसे करायचे पाहूयात(Easy Trick to make Soft Til Ladoo).
तिळाचे पौष्टीक लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य
तीळ
गुळ
कोवळ्या हरबऱ्याच्या पानांची करा अस्सल गावरान झणझणीत भाजी, घ्या गावाकडची मस्त रेसिपी
शेंगदाणे
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ घालून त्याची पावडर तयार करून घ्या. तयार तिळाची पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घालून भरड वाटून घ्या. मग त्यात तिळाची पावडर, एक मोठा गुळाचा खडा घालून एकत्र वाटून घ्या.
तयार वाटलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्याचे गोल आकारामध्ये लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे पौष्टीक तिळाचे लाडू खाण्यासाठी रेडी. स्टोर करून ठेवल्यास हे लाडू महिनाभर टिकतील.
पौष्टीक तिळाचे लाडू खाण्याचे फायदे
तीळ खाण्याचे फायदे
हिवाळ्यात तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. तिळात पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-६, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे गुणधर्म असतात. मुख्य म्हणजे तीळ हाडांसाठी खूप उपयुक्त ठरते. दररोज एक लाडू खाल्ल्याने हाडं मजबूत होतील. शिवाय रोग प्रतिकारशक्तीही वाढेल.
शेंगदाणे खाण्याचे फायदे
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, व हेल्दी फॅट्स आढळतात. त्यामुळे नियमित मुठभर शेंगदाणे खाल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामुळे पोटाचे विकार दूर होतात. शिवाय स्नायूंच्या वाढीसाठी आणि विकासासाठी मदत करते. मुख्य म्हणजे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
झणझणीत मटार पोहे करण्याची चमचमीत रेसिपी, शक्ती कपूर म्हणतो मटार पोहे फार आवडतात कारण...
गुळ खाण्याचे फायदे
साखरेपेक्षा गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळामध्ये व्हिटॅमिन बी१, बी६, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आर्यन, कार्बोहायड्रेट आढळते. यामुळे थकवा, कमजोरी, रक्ताची कमतरता भरून काढणे, शिवाय उच्च रक्तदाबाचा त्रासही कमी होतो.