Join us  

घरच्याघरी कॅरॅमल सॉस बनवण्याची सोपी पद्धत, झटपट रेसिपी, कष्ट कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2023 6:31 PM

Easy Way To Make Caramel Sauce At Home : कॅरॅमल सॉस अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनावता येऊ शकतो.

कॅरॅमल कस्टर्ड, कॅरॅमल पॉपकॉर्न, कॅरॅमल आईस्क्रीम, कॅरॅमल केक असे कॅरॅमल पासून बनलेले बरचे पदार्थ आपणं डेझर्ट म्हणून खातो. हे गोड कॅरॅमल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय आहे. केक, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थंची चव अधिक वाढविण्यासाठी त्यावर चॉकलेट सॉस किंवा कॅरॅमल सॉस  घालून खाल्ले जाते. कित्येकदा आपण फेलवर्ड आईस्क्रीम न आणता साधं प्लेन आईस्क्रीम आणून त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गोड सॉस, ड्रायफ्रुटस किंवा फळांचे पल्प घालून आवडीने खातो. गोड सॉस मध्ये कॅरॅमल सॉस हा सगळ्या गोड पदार्थांमध्ये वापरू शकतो. कॅरॅमल सॉस अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनावता येऊ शकतो. तसेच हा सॉस बराच काळ टिकतो. कॅरॅमल सॉस घरी कसा बनवता येईल याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(Easy Way To Make Caramel Sauce At Home).        Your Food Lab या इंस्टाग्राम पेजवरून कॅरॅमल कसे बनवावे याची रेसिपी शेअर करण्यात आले आहे.  

साहित्य - 

१. साखर - १ कप २. पाणी - १/४ कप ३. बटर - ४ टेबलस्पून ४. फ्रेश क्रिम - १/२ कप ५. व्हॅनिला इसेन्स - १/२ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार   

कृती - 

१. एका पॅनमध्ये साखर घेऊन त्यात पाणी ओतावे. त्यानंतर मंद आचेवर ही साखर कॅरॅमलाइज्ड होईपर्यंत उकळवून घ्या. साखर कॅरॅमलाइज्ड होईपर्यंत त्याला चमच्याने ढवळू नका. असे केल्यास साखरेचे खडे तयार होऊन त्याच्या घट्ट पाक तयार होईल.२. हे मिश्रण मंद आचेवर असताना साखर कॅरॅमलाइज्ड झाल्यानंतर त्यात बटर घाला व ते मिश्रण चमच्याने ढवळून घ्या.     ३. बटर संपूर्णपणे वितळून कॅरॅमलमध्ये एकजीव झाल्यांनतर गॅस बंद करून त्यात फ्रेश क्रिम व व्हॅनिला इसेन्स घाला. आता हे मिश्रण एकजीव करून घ्या.४. यानंतर कॅरॅमल सॉस थंड करून घ्या. 

साठवण करण्याबाबत - 

१. हा कॅरॅमल सॉस थंड झाल्यांनतर एका हवाबंद डब्यात किंवा स्क्वीझ बॉटलमध्ये भरून ठेवा. २. कॅरॅमल सॉस व्यावस्थित हवाबंद डब्यात ठेवला तर २० ते २५ दिवस चांगला टिकतो.

टॅग्स :अन्न