Lokmat Sakhi >Food > हक्का नुडल्स बनवण्याची सोपी पद्धत, चमचमीत - चविष्ट, एकदा घरी ट्राय कराच..

हक्का नुडल्स बनवण्याची सोपी पद्धत, चमचमीत - चविष्ट, एकदा घरी ट्राय कराच..

Hakka Noodles घरी नेहमी नेहमी तेच तेच जेवण जेऊन कंटाळा आला असेल, तर आजच घरी हक्का नुडल्स ट्राय करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 06:44 PM2022-12-03T18:44:23+5:302022-12-03T18:45:20+5:30

Hakka Noodles घरी नेहमी नेहमी तेच तेच जेवण जेऊन कंटाळा आला असेल, तर आजच घरी हक्का नुडल्स ट्राय करा.

Easy way to make Hakka noodles, crispy - tasty, try it at home.. | हक्का नुडल्स बनवण्याची सोपी पद्धत, चमचमीत - चविष्ट, एकदा घरी ट्राय कराच..

हक्का नुडल्स बनवण्याची सोपी पद्धत, चमचमीत - चविष्ट, एकदा घरी ट्राय कराच..

चायनीज गल्लोगल्लीत मिळणारं पदार्थ बनला आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चायनीजमधील विविध पदार्थ आवडायला लागले आहे. घरी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर आपण चायनीज घरी ट्राय करू शकता. लहान मुलांना नुडल्स प्रचंड आवडतात. नुडल्समध्ये विविध प्रकार आहेत. मात्र, सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे हक्का नुडल्स. बाहेरून नुडल्स आणण्यापेक्षा आपण घरी देसी नुडल्स बनवू शकता. 

हक्का नुडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य

हक्का नुडल्स

पाणी 

किसलेले गाजर

चिरलेली कोबी

फरसबी बारीक कापून 

चिरलेला कांदा 

पातीचा कांदा

9-10 सोललेल्या लसणीच्या पाकळ्या

सोया सॉस

चिली सॉस

रेड चिली सॉस

व्हिनेगर (व्हाईट)

मीठ चवीपुरते (अजिनोमोटो वापरू नये त्याऐवजी मीठ वापरावे)

तेल

कृती

हक्का नुडल्स पाण्यात शिजवून घ्या. शिजल्यावर त्यातून पाणी काढून टाका. एका पातेलीत तेल गरम करावे. त्यात कांदा, पातीचा कांदा, गाजर, कोबी, फरसबी, ठेचलेली लसूण घाला, आणि व्यवस्थित परता. लसणीचा घमघमाट यायला लागला की त्यात मीठ, वरून सोसा सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर घालून नीट परता.

हे एकत्र मिक्स झाले की वरून शिजलेले हाका नुडल्स घालून परतावे आणि दोन मिनिट व्यवस्थित वाफ देऊन गरमागरम खायला द्यावे. तुम्हाला हवं असल्यास, इतर सॉससह तुम्ही टॉमेटो सॉसही यामध्ये मिक्स करू शकता. अशा प्रकारे हक्का नुडल्स तयार.

Web Title: Easy way to make Hakka noodles, crispy - tasty, try it at home..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.