Lokmat Sakhi >Food > रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे वाचून म्हणाल आधी का नाही समजलं!

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे वाचून म्हणाल आधी का नाही समजलं!

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:19 IST2024-12-26T16:18:44+5:302024-12-26T16:19:44+5:30

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात.

eat 2 cardamom before going to sleep at night you will get tremendous benefits | रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे वाचून म्हणाल आधी का नाही समजलं!

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे वाचून म्हणाल आधी का नाही समजलं!

वेलची हा स्वयंपाकघरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात.

आयुर्वेदात वेलचीला  'क्वीन ऑफ स्पाइसेस' म्हणजेच 'मसाल्यांची राणी' म्हटलं जातं, जी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. फक्त २ वेलची खाल्ल्याने तुमची पचनशक्ती तर सुधारतेच पण त्याचबरोबर ॲसिडिटी, झोपेची समस्या आणि तोंडातून येणारा वास यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर वेलचीचे हे छोटे दाणे तुमच्या शरीराला डिटॉक्स करून सकाळी ताजेतवाने वाटण्यास मदत करू शकतात. 

पचनक्रिया सुधारते

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास पचनक्रिया मजबूत होते. वेलचीमध्ये आढळणारे नैसर्गिक घटक पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. हे तुमचं अन्न नीट पचण्यास मदत करतं आणि पोट साफ होतं.

झोपेची गुणवत्ता सुधारते

जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल किंवा वारंवार झोप येण्यात त्रास होत असेल तर वेलची तुम्हाला मदत करू शकते. वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहतं. झोपण्यापूर्वी खाल्ल्याने चांगली झोप येते.

तोंडातून वास येत नाही

वेलची खाल्ल्याने तोंडातून वास येत नाही. दात आणि हिरड्याही निरोगी राहतात.

वजन कमी करण्यात मदत

वेलची मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. रात्री खाल्ल्याने शरीरातील फॅट वेगाने बर्न होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. सूज कमी होते.

इम्यून सिस्टिम मजबूत 

वेलचीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. हे इम्यून सिस्टिम मजबूत करतात आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम देतात.
 

Web Title: eat 2 cardamom before going to sleep at night you will get tremendous benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.