Lokmat Sakhi >Food > खा चटपटीत 'दही कचोरी कप'! हिवाळ्यात सायंकाळी खाण्यासाठी उत्तम पदार्थ, खायला मस्त - चव जबरदस्त - पाहा रेसिपी...

खा चटपटीत 'दही कचोरी कप'! हिवाळ्यात सायंकाळी खाण्यासाठी उत्तम पदार्थ, खायला मस्त - चव जबरदस्त - पाहा रेसिपी...

Dahi Kachori Cups Recipe : कचोरी पासून तुम्ही सोपी आणि झटपट होणारी दही कचोरी कप्स (Dahi Kachori Cups) ही नवीन डिश ट्राय करू शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 11:31 AM2022-12-14T11:31:29+5:302022-12-14T11:50:28+5:30

Dahi Kachori Cups Recipe : कचोरी पासून तुम्ही सोपी आणि झटपट होणारी दही कचोरी कप्स (Dahi Kachori Cups) ही नवीन डिश ट्राय करू शकता.

Eat a quick 'Dahi Kachori Cups'! Great food for winter evenings, see recipe | खा चटपटीत 'दही कचोरी कप'! हिवाळ्यात सायंकाळी खाण्यासाठी उत्तम पदार्थ, खायला मस्त - चव जबरदस्त - पाहा रेसिपी...

खा चटपटीत 'दही कचोरी कप'! हिवाळ्यात सायंकाळी खाण्यासाठी उत्तम पदार्थ, खायला मस्त - चव जबरदस्त - पाहा रेसिपी...

आपण ऑफिसमध्ये असू किंवा घरी संध्याकाळी टी - टाइम स्नॅक म्हणून आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. अश्यावेळी तिखट शेव, चकली, फरसाण, गाठीया, कचोरी असे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तसेच वडापाव, फ्रँकी, मसाला डोसा, सँडवीज, पाणीपुरी, भेळ, भजी, मोमोज अशा काही पदार्थांवर ताव मारला जातो. दररोज संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी काय बनवावं हा मोठा प्रश्न उद्भवतो. कारण संध्याकाळी तर हलकं आणि चविष्ट असं काही लागत. जेणे करून आपली भूक पण भागेल आणि जास्त पोट देखील भरायला नको. साधारणतः संध्याकाळच्या हलक्या - फुलक्या भुकेसाठी आपल्या सुक्या खाऊच्या डब्ब्यात कचोरी हा पदार्थ असतोच. याच कचोरी पासून तुम्ही सोपी आणि झटपट होणारी दही कचोरी कप्स (Dahi Kachori Cups) ही नवीन डिश ट्राय करू शकता. यामुळे तुमची संध्याकाळची भूक भागेल आणि काहीतरी वेगळ खाल्ल्याचा आनंदही मिळेल (Dahi Kachori Cups).

_spkitchen_ या इन्स्टाग्राम पेजवर दही कचोरी कप्स (Dahi Kachori Cups) ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे.  

 

साहित्य - 

१. कचोरी - २ ते ३  
२. गोड दही - २ टेबलस्पून
३. बारीक चिरलेला टोमॅटो - १ 
४. लाल तिखट - आवडीनुसार 
५. हिरव्या मिरचीची चटणी - १ टेबलस्पून 
६. खजूर - चिंचेची चटणी - १ टेबलस्पून 
७. चाट मसाला - आवडीनुसार 
८. लिंबू रस - १ टेबलस्पून 
९. बारीक शेव - १ टेबलस्पून 
१०. डाळिंबाचे दाणे - १ टेबलस्पून 
११. कोथिंबीर - १ टेबलस्पून 

कृती -

१. एका छोट्या कपात तळाशी कचोरीचे छोटे - छोटे तुकडे करून घाला. 
२. त्यावर गोड दही घालून आवडीनुसार लाल तिखट भुरभुरून घ्यावे. 
३. मग बारीक चिरलेल्या टोमॅटोचा एक थर लावून घ्या त्यावर हिरवी चटणी घाला. 
४. खजूर आणि चिंचेच्या चटणीचा एक थर लावा. थोडासा चाट मसाला भुरभुरून त्यावर लिंबाचा रस सोडा. 
५. सर्वात शेवटी शेव, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून गार्निशिंग करून घ्या. 

आंबट - गोड चटपटीत दही कचोरी कप्स खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Eat a quick 'Dahi Kachori Cups'! Great food for winter evenings, see recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.