Lokmat Sakhi >Food > चॉकलेट पराठा खाल्लाय कधी? करा आणि द्या स्वत:लाच एक मस्त चॉकलेटी ट्रीट!

चॉकलेट पराठा खाल्लाय कधी? करा आणि द्या स्वत:लाच एक मस्त चॉकलेटी ट्रीट!

चॉकलेटचा पराठा दोन प्रकारे करता येतो, बघा तुम्हाला कोणता आवडतोय ते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 01:24 PM2021-06-04T13:24:34+5:302021-06-04T13:28:42+5:30

चॉकलेटचा पराठा दोन प्रकारे करता येतो, बघा तुम्हाला कोणता आवडतोय ते?

eat chocolate paratha? Make and give yourself a cool chocolate treat! here is the recipe | चॉकलेट पराठा खाल्लाय कधी? करा आणि द्या स्वत:लाच एक मस्त चॉकलेटी ट्रीट!

चॉकलेट पराठा खाल्लाय कधी? करा आणि द्या स्वत:लाच एक मस्त चॉकलेटी ट्रीट!

Highlightsचॉकलेट पराठा करा, आणि मस्त खा स्वत:ही!

शुभा प्रभू साटम

आता रविवारी काहीतरी भारी कर, अशी भूणभूण लेकरं तरी करतात किंवा मग आपल्यालाही वाटतं की मस्त काहीतरी करुन जरा स्वत:लाच ट्रीट द्यावी.
तर या वीकेंडला स्वत:ला अशी ट्रीट द्यायची असेल तर हा एकदम अफलातून आणि करायला सोपा पदा‌र्थ आहे. चॉकलेट पराठा.
आपल्याला साखर/गूळ पोळी माहीत आहे, पण ती मुलांना आवडतेच असं नाही. हा जो चॉकलेट पराठा आहे तो मात्र आवडीने खाल्ला जातो, गार झाला तरीही चवीला छान लागतो आणि चक्क फ्रीजमध्ये चार पाच दिवस उत्तम टिकतो,करायला पण सोप्पा.

चॉकलेट पराठा कसा कराल?

साहित्य
कणिक १ वाटी
चॉकलेट किसून पाव वाटी
चीझ अगदी थोडेसे
तूप /बटर/

कृती


हा पराठा दोन प्रकारे होतो,किसलेले आणि वितळवलेले चॉकलेट कणकेत घालून ती तिंबून घेणे किंवा चॉकलेट+चीझ याचे मिश्रण भरून करणे,मी दोन्ही पध्दती सांगते.
प्रथम जर एकत्र मिसळून करणार असल्यास
ओव्हनमध्ये अथवा डबल बॉयलरमध्ये चॉकलेट वितळवून घ्यावे.
कणकेत ते घालून ती व्यवस्थित तिंबून घ्यावी,मोहन हवं तर घालावे.
या पिठाचे नेहमीप्रमाणे छोटे छोटे पराठे लाटून बटरवर खरपूस भाजून घ्यावेत
देताना त्यावर चॉकलेट किस अथवा मध घालून द्यावा.

दुसरी पद्धत


चॉकलेट किसून घ्यावे.
चीझ घालणार असल्यास तेही किसून घ्यावे.
दोन्ही एकत्र करावे.
मऊसर मळलेल्या कणकेचा उंडा करून त्यात चीझ +चॉकलेट किस भरून हलक्या हाताने जाडसर पराठा लाटून घ्यावा,फार मोठा लाटू नये,
मंद आगीवर लालसर शेकून घ्यावा
एक वेगळा पदार्थ तयार. चॉकलेट पराठा करा, आणि मस्त खा स्वत:ही!


(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: eat chocolate paratha? Make and give yourself a cool chocolate treat! here is the recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.