Join us  

शेवग्याच्या शेंगा खा, व्हिॅमिनच्या गोळ्या विसरा; अशक्तपणावर करा मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 11:45 AM

शेवग्याच्या शेंगाच नाही तर पालाही अत्यंत औषधी आणि शरीरासाठी वरदान आहे.

ठळक मुद्देया झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग केला जातो म्हणून या झाडाला मिरॅकल ट्री असे म्हटले जाते.औषधे खाण्यापेक्षा आहार सर्वसमावेशक घेतला तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो

डॉ. स्वाती धर्मपाल वासनिक

शेवग्याच्या शेंगा. त्यांना शिग्रु असंही म्हणतात, आर्थिक ,औषधी व पोषणदृष्ट्या त्यांचं अनन्य साधारण महत्व आहे. १०० ग्राम शेवग्यात सात संत्र्यांएवढे विटामिन असते. पालक भाजीपेक्षा तीन पट जास्त लोहतत्व असते. केळीपेक्षा तीन पट जास्त पोटॅशियम असते व चार पट जास्त कॅलशियम असते. शेवगा बियांचे चूर्ण हे सुक्ष्म जिवाणू, फंगस - बॅक्टेरिया इत्यादीचानाश करण्यासाठी, जैवीक निर्जंतुक म्हणून उपयोगात येतो. शेवग्याच्या पानांमधून व्हिटॅमिन ए, बी 1, बी 2, बी 6, सी, कॅलशियम आणि मॅगनेशियम यांची पूर्तता होते. शेवग्याच्या शेंगाचा उपयोग नियमित केल्यास वयाच्या पूर्वी केस पांढरे होत नाही, त्वचा चांगली राहते, सुरकुत्या येत नाही, त्वचा आणि केस चमकदार राहतात, हाडं मजबूत राहतात. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग केला जातो म्हणून या झाडाला मिरॅकल ट्री असे म्हटले जाते.

(Image : Google)

शेवग्याचे उपयोग कोणते?

१. शेंगा उकडून खाल्ल्या तर केस अकाली पांढरे होत नाहीत. शेंगा उकळून ते पाणी नैसर्गिक कंडीशनर म्हणून उपयोगात येते. त्वचा चमकते.

२. शरीरावरची सुज कमी होण्यास शेवगा उपयुक्त ठरतो.

३. पोटाचे आजारात मलबद्धता, अपचन ,इन्फेक्शन इत्यादी मध्ये उपयोग होतो.

४. कॅल्शिअम व फॉस्फरसने हाडं मजबूत बनतात. हाडाची झीज थांबते.

५. लोहाचे योग्य मात्रेमध्ये शरीरात शोषण होते व रक्त पेशी वाढविण्यास मदत होते म्हणून याचा उपयोग ॲनिमिया व सिकलसेल मध्ये याचा उपयोग होतो .

६. शेवग्यामध्ये व्हिटॉमिन ए जास्त प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या विविध आजारामध्ये याचा उपयोग होतो .

(Image : Google)

 शेवगा कोणी खाऊ नये ?

१. पोट चांगले साफ होते पण याचा जास्त प्रमाणात उपयोग केल्यास हागवण लागण्याची शक्यता असते

२. गरोदरपणात जपून खावे.

३. स्तनदा मातांनीही खाऊ नये.

४. लोकांना रक्त पातळ करणारे औषधे सुरू असतील त्यांनी याचा उपयोग करू नये .

(लेखिका आयुर्वेद अभ्यासक आहेत)

टॅग्स :अन्नआरोग्यभाज्या