Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा.. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा.. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. यासोबतच सर्दी, खोकला, फुफुसांसंदर्भातले आजार तसेच साथीचे आजार पसरण्याची भिती पावसाळ्यात वाढू लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत काही बंधने पाळणे अतिशय गरजेचे आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 07:37 PM2021-06-08T19:37:47+5:302021-06-08T19:43:33+5:30

पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. यासोबतच सर्दी, खोकला, फुफुसांसंदर्भातले आजार तसेच साथीचे आजार पसरण्याची भिती पावसाळ्यात वाढू लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत काही बंधने पाळणे अतिशय गरजेचे आहे. 

Eat healthy and avoid some food items in rainy season | पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा.. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा.. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

Highlightsचटकदार पदार्थ खायचे तर गाड्यावरचेच हवे, असा बहुतेकांचा हट्ट असतो. पण मनाने कितीही हट्ट केला तरी, आवर घाला आणि असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. कारण हे पदार्थ खाऊन आपसूकच विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते.

'काय बाई हा पावसाळा, थोडंसं खाण्यात इकडे- तिकडे झालं की बिघडलं पोट... ' अशी तक्रार करताना आपण  आजवर अनेक जणींना ऐकलं आहे. पण असे असले तरी खाण्याच्या बाबतीतल्या काही सवयी आपण  सोडत नाही आणि पर्यायाने मग बऱ्याच जणींना पावसाळ्यात वारंवार पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो.
पावसाळा हा अनेक जणांचा अतिशय आवडता ऋतू. आल्हाददायक वातावरण आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ. मंद मंद पाऊस भूरभुरू लागला की, आपसूकच चटकदार पदार्थ खाण्याची ओढ लागते. पाणीपुरी, भेळ, पॅटीस, गरमागरम भजी, पकोडे, मॅगी आणि असेच एकापेक्षा एक टेम्पटिंग पदार्थ खाण्याची जबरदस्त इच्छा होऊ लागते. त्यातही आणखी भर म्हणजे हे सगळे पदार्थ घरी केलेले आपल्याला नको असतात. असे चटकदार पदार्थ खायचे तर गाड्यावरचेच हवे, असा बहुतेकांचा हट्ट असतो. पण मनाने कितीही हट्ट केला तरी, आवर घाला आणि असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. कारण हे पदार्थ खाऊन आपसूकच विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते. 


याविषयी सांगताना आहारतज्ञ डॉ. अलका कर्णिक म्हणाल्या की, पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. यासोबतच सर्दी, खोकला, फुफुसांसंदर्भातले आजार तसेच साथीचे आजार पसरण्याची भिती पावसाळ्यात वाढू लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत काही बंधने पाळणे अतिशय गरजेचे आहे. 
डॉ. अलका कर्णिक यांनी सांगितल्यानुसार पावसाळ्यात हे पदार्थ खाणे आवर्जून टाळा-
१. पावसाळ्यात मांसाहार घेणे पुर्णपणे बंद करावे. तिखट, स्पाईसी पदार्थही खाऊ नयेत.
२. उन्हाळ्यात आपण कोशिंबीरच्या माध्यमातून भरपूर सलाड खातो. परंतू पावसाळ्यात मात्र कोणत्याही भाज्या कच्च्या खाणे पुर्णपणे टाळावे. कारण पचनशक्ती मंद झाल्याने त्यांचे पचन होत नाही.
३. पावसाळा सुरू झाल्यावर आंबा देखील पचत नाही. त्यामुळेे पाऊस पडताच आंबा खाण्याचा मोह टाळावा. 
४. या दिवसांमध्ये पालेभाज्या खाणे पुर्णपणे बंद करावे. याचे मुख्य कारण म्हणजे या भाज्या जेव्हा शेतात असतात तेव्हा त्यांची लांबी लहान असल्याने मातीतील तसेच पावसाच्या पाण्यातील जीवजंतू भाज्यांमध्ये जातात आणि त्या माध्यमातून आपल्या घरात येतात. 
५. बेसन पीठापासून, मैद्यापासून बनविलेले पदार्थ पावसाळ्यात पुर्णपणे टाळावे.


६. बटाटा, वांगे, पावटा, कोळीत, उडदाचे पदार्थ, तळलेले पदार्थ या दिवसांमध्ये खाऊ नयेत.
७. खारवलेले पदार्थ, लोणची, पापड हे देखील पावसाळ्यात खाल्ल्याने अनेक जणांना त्रास होऊ शकतो.
८. पावसाळ्यात थंड वातावरण असल्याने थंड पेय, थंड पदार्थ देखील खाऊ नयेत.
९. मोड आलेली कडधान्ये कच्ची न खाता शिजवून खाण्यालाच प्राधान्य द्यावे. 
१०. उघड्यावरचे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे. 

Web Title: Eat healthy and avoid some food items in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.