Join us  

वेटलॉस करताय, खा गरमगरम ब्रोकोली उत्तप्पा, पाहा झटपट सोपी टेस्टी रेसीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2023 7:21 PM

Weight Loss Recipe - Tasty Broccoli Uthappa, Try it Simple Yummy Recipe ब्रोकोलीला आपण भाज्यांमध्ये खाल्लं असेल, ट्राय करा ब्रोकोली उत्तप्पा, चवीला यम्मी - पौष्टीक

वेट लॉसच्या प्रवासात काहीतरी चमचमीत परंतु, हेल्दी खाण्याची इच्छा होत राहते. सर्वांनाच डाएट फॉलो करताना नाकीनऊ येतात. वेट लॉस करताना आपण पौष्टीक पदार्थ खातोच परंतु, घरात चमचमीत - खमंग सुवास दरवळला की खाण्याचा मोह काही आवरत नाही. आपल्याला जर नाश्त्यामध्ये चमचमीत यासह पौष्टीक खाण्याची इच्छा होत असेल तर, ब्रोकोलीपासून तयार झटपट उत्तप्पा ट्राय करा.

ब्रोकोलीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. ब्रोकोलीचा वापर सॅलड्स, तळलेले पदार्थ, करी आणि सूप, यासाठी केला जातो. ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्वे ए आणि सी, फॉलिक अॅसिड, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे जास्त प्रमाणात आढळतात. त्यात फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे आजारपण आणि संसर्गाविरूद्धच्या लढ्यात मदत करतात. चला तर मग बहुगुणी ब्रोकोलीपासून उत्तप्पा कसा बनवतात पाहूयात..

ब्रोकोली उत्तप्पा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

ब्रोकोली

मीठ

हिरवी मिरची

कोथिंबीर

चिली फ्लेक्स

रवा

दही

पाणी

कृती

सर्वप्रथम, ब्रोकोलीला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्या. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, चिली फ्लेक्स, मीठ, १ कप रवा, दही आणि आवश्यकतेनुसार पाणी मिश्रण मिक्स करा.

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेऊन काही वेळ बाजूला ठेवा. दुसरीकडे एक नॉन स्टिक पॅन गॅसवर गरम करत ठेवा. त्यावर थोडे तेल पसरवा, आणि ब्रोकोलीचे मिश्रण पॅनवर पसरवा. उत्तप्पा दोन्ही बाजूने सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे ब्रोकोलीपासून तयार स्वादिष्ट हेल्दी ब्रोकोली उत्तप्पा खाण्यासाठी रेडी. आपण हा पदार्थ हिरव्या चटणीसह खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स