Join us  

खा चमचाभर गुलकंद, तबियत खुश! उत्तम गुलकंद करण्याची कृती, शुद्ध गुलकंदाचे फायदे खूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 6:10 PM

Recipe: how to make gulkand- गावरान गुलाबांचा (rose) मस्त गुलकंद.. रोज एक चमचा खा आणि मिळणारे भन्नाट फायदे (benefits of eating gulkand)स्वत:च अनुभवा.. 

ठळक मुद्देबॉडी डिटॉक्स (body detox)करण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरतं.

गुलकंदाचा डबा उघडला की गुलाबाच्या फुलाचा मस्त सुवास दरवळू लागतो... उन्हाळ्यात गुलकंदाची मागणी खूप वाढलेली असते. एरवी मात्र ८- ९ महिने गुलकंदाला कुणीही विचारत नाही. पण गुलकंद हा केवळ उन्हाळ्यातच खाण्याचा पदार्थ नाही. तुम्ही रोज योग्य प्रमाणात गुलकंद खाल्लं तर त्याने तब्येतीला कोणताही अपाय होत नाही किंवा गुलकंद खाणं बाधतंही नाही. त्यामुळे खास उन्हाळ्यासाठी राखून ठेवलेला हा पदार्थ एरवीही कधी बाहेर काढा. कारण गुलकंद खाण्याचे भरपूर फायदे असून डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठीही गुलकंद खूप उपयुक्त आहे. 

 

गुलाब पाकळ्यांमधील सगळा पोषक अर्क गुलकंदात उतरलेला असतो. त्यामुळे अगदी वजन कमी करण्यापासून ते पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यापर्यंत अनेक बाबतीत गुलकंद उपयुक्त ठरतो. आयुर्वेदानुसार तर गुलकंदाला औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे. असा हा पौष्टिक गुलकंद घरीही तयार करता येतो. घरी तयार केलेल्या गुलकंदात कोणतीही रसायने किंवा इसेंन्स वापरण्यात आलेली नसतात. त्यामुळे हा गुलकंद प्रकृतीसाठी अतिशय उत्तम ठरतो. ही सोपी पद्धत (how to make gulkand) वापरून तुम्हीही घरच्याघरी गुलकंद तयार करू शकता. 

 

गुलकंद खाण्याचे फायदे Benefits of eating gulkand- वजन नियंत्रणात ठेवण्यास (Weightloss) गुलकंद उपयुक्त ठरते. कारण गुलकंद तयार करण्यासाठी गुलाब पाकळ्यांचा वापर केला जातो. या पाकळ्यांमध्ये अजिबातच फॅट्स नसतात. - तोंड आलं असल्यास, तोंडात चट्टे, फोडं (mouth ulcer)आली असल्यास गुलकंद खाणं उपयुक्त ठरतं. - गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बी (vitamin b)चे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे व्हिटॅमिन बी ची कमतरता असणाऱ्यांनी गुलकंद नियमित खावं.- स्क्रिनसमोर सतत बसल्यामुळे डोळ्यांची (eyes) जळजळ होत असेल, तर गुलकंद खाणं हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. - डोळे लाल होत असतील, डोळ्यांना रांजनवाडी झाली असेल, तरी गुलकंद खाणं फायद्याचं ठरतं.- ॲसिडीटी (acidity), अपचन, पोट साफ न होणे, असा त्रास सतत होत असेल तर आठवडाभर तरी नियमितपणे रोज एक चमचा गुलकंद खाल्लं पाहिजे. यामुळे पचनक्रिया सुधारेल.

- गुलकंद खाल्ल्यामुळे शरीराला उर्जा (energy) मिळते.- गुलकंदामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे थकवा, मरगळ दूर करण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरतं. - गुलकंदामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी संतूलित ठेवण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरतं.  - गुलकंद खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. त्यामुळे लहान मुलांनाही नियमितपणे गुलकंद खाण्यास द्यावे. - बॉडी डिटॉक्स (body detox)करण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरतं. त्यामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर पडतात. म्हणूनच त्वचेचा पोत सुधारण्यासाठी, त्वचा चमकदार होण्यासाठीही गुलकंद खावे.  

 

गुलकंद तयार करण्याची रेसिपीRecipe: how to make gulkandप्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर (Rujuta Divekar)यांनी गुलकंद तयार करण्याची रेसिपी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांनी सांगितलेली ही रेसिपी....- गुलाबाच्या काही पाकळ्या (rose petals)घ्या आणि त्या स्वच्छ काचेच्या बरणीत टाका. - एक वाटी गुलाबाच्या पाकळ्या असतील, तर तेवढीच साखर घ्यावी आणि त्यावर टाकावी.- तुम्हाला पाहिजे असल्यास पाकळ्यांचा आणि साखरेचा अजून एक थर द्यावा.- बाटलीचे झाकण घट्ट लावून ती सुर्यप्रकाशात ठेवावी.- यानंतर साखरेला पाणी सुटून साधारण १० दिवसांत गुलकंद तयार होतो.  

टॅग्स :अन्नपाककृतीआरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स