Lokmat Sakhi >Food > गार-उरलेले कांदेपोहे खाण्यात मजा नाही; त्या पोह्यांची करा झटपट खमंग पोहे टिक्की!

गार-उरलेले कांदेपोहे खाण्यात मजा नाही; त्या पोह्यांची करा झटपट खमंग पोहे टिक्की!

उरलेला पदार्थ पुन्हा खायला कंटाळा येतो, अशावेळी त्याचे काही चटपटीत छान करता आले तर...पाहूया सोपी रेसिपी, गार पोह्यांची चमचमीत टिक्की.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 07:07 PM2022-01-24T19:07:26+5:302022-01-31T16:21:08+5:30

उरलेला पदार्थ पुन्हा खायला कंटाळा येतो, अशावेळी त्याचे काही चटपटीत छान करता आले तर...पाहूया सोपी रेसिपी, गार पोह्यांची चमचमीत टिक्की.

Eating frozen poha is not fun; Make instant testy pohe tikki! | गार-उरलेले कांदेपोहे खाण्यात मजा नाही; त्या पोह्यांची करा झटपट खमंग पोहे टिक्की!

गार-उरलेले कांदेपोहे खाण्यात मजा नाही; त्या पोह्यांची करा झटपट खमंग पोहे टिक्की!

Highlightsराहिलेल्या पोह्यांपासून करा हटके रेसिपी...पोह्यांची चमचमीत टिक्की एकदा करुन तर पाहा...

पोहे हा आपल्याकडील अगदी झटपट होणारा, सगळ्यांच्या आवडीचा आणि पोटभरीचा असा पदार्थ. आपल्या देशात, राज्यात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे केले जातात. पण महाराष्ट्रात सर्रास केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे. नाश्त्याला किंवा ऐनवेळी कोणी पाहुणे येणार म्हणून कांदेपोहे करणे नेहमीचेच. पण हे पोहे जास्त झाले की त्याचे काय करायचे कळत नाही. गारेगार उरलेले पोहे पुन्हा खाणे आपल्या जीवावर येते. हे पोहे गरम केले की एकतर ते कडक होतात नाहीतर त्याची चव जाते. अशावेळी या राहीलेल्या पोह्यांचे काय करायचे असा प्रश्न तुम्हालाही पडतो? मग घ्या ही घ्या पोह्यांपासून होणारी झटपट टिक्की. पोह्याच्या अशा टिक्की, कटलेट हे पदार्थ पोटभरीचेही होतात आणि चविष्टही. ट्रेनमध्ये देतात तसे ब्रेड-कटलेट, त्यावर भुरभुरलेली शेव,  G2 या कंपनीचे टोमॅटो किंवा सॉल्टेड वेफर्स अशी मस्त साजरी डिश होणार असेल तर पोह्यांबरोबरचं हे कॉम्बिनेशन नक्की यादगार ठरेल.

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

१. ब्रेड स्लाईस - २ ते ३ स्लाईस 
२. आलं-मिरची-लसूण पेस्ट - १ चमचा
३. शिमला मिर्ची - १ 
४. गाजर - १ मध्यम आकाराचे 
५. मटार - अर्धी वाटी दाणे 
६. आमचूर पावडर - अर्धा चमचा 
७. कोथिंबिर - अर्धी वाटी चिरलेली 
८. मीठ - चवीनुसार 
९. तांदळाचे पीठ - अर्धी वाटी

(Image : Google)
(Image : Google)

कृती - 

१. पोह्यामध्ये सगळ्या भाज्या बारीक चिरुन घालाव्यात 
२. त्यामध्ये आलं-मिरची लसूण पेस्ट, आमचूर पावडर, कोथिंबीर, मीठ सगळे घालावे.
३. यानंतर त्यामध्ये ब्रेडचे स्लाईस पाण्यात भिजवून घालावेत. 
४. या मिश्रणात तांदळाचे पीठ आणि थोडे दही घालावे.
५. हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
६. एका मोठ्या भांड्यात घेऊन मिश्रण हाताने एकजीव करावे. 


 

७. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये उकडलेला बटाटाही घालू शकता. 
८. या मिश्रणाच्या एकसारख्या टिक्की थापून घेऊन त्या तव्यातर तेल घालून शॅलो फ्राय कराव्यात. 
९. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत या टिक्की खायला अतिशय चांगल्या लागतात. 
१०. पोह्यामध्ये मिरच्या असल्यास त्या आधीच बाजूला काढून ठेवाव्यात. 

Web Title: Eating frozen poha is not fun; Make instant testy pohe tikki!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.