Jaggery and roasted chickpeas Benefits : उन्हाळा सुरू झाला की, वाढत्या तापमानामुळे शरीराची एनर्जी कमी होते. शरीरातील पाणी कमी झालं की, डिहायड्रेशनची समस्याही होते. अशात या दिवसांमध्ये शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी एक खास उपाय तुम्ही करू शकता. महत्वाची बाब म्हणजे हा उपाय महिलांसाठी वरदानच ठरतो. चला तर जाणून घेऊ काय आहे भरपूर एनर्जी देणारा हा उपाय.
एका रिपोर्टनुसार, रोज मुठभर चणे आणि त्यासोबत गूळ खाल्ल्यास शरीराला इतके फायदे मिळतात ज्याची तुम्हाला कल्पनाही नसेल. चणे आणि गूळ हे कॉम्बिनेशन शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी फायदेशीर ठरतं.
चणे आणि गूळ एकत्र खाल्ल्यानं शरीराला आयर्न, फायबर, प्रोटीन आणि इतरही अनेक मिनरल्स मिळतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी तर मिळतेच, सोबतच पचनक्रिया वाढते, इम्यूनिटी वाढते आणि हार्मोन्सही संतुलित राहतात.
फुटाणे आणि गुळाचे फायदे
हृदयासाठी फायदेशीर
गुळामधील पोटॅशिअम आणि चण्यामधील फायबर एकत्रपणे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयावरील दबाव कमी होतो. तसेच हृदयरोगासाठी कारणीभूत कोलेस्टेरॉल लेव्हलही कमी होते.
दिवसभर मिळेल एनर्जी
जर तुम्हाला दिवस सतत थकवा येत असेल किंवा कमजोरी जाणवत असेल तर गूळ आणि चणे खाणं तुम्हाला एनर्जी देणारं ठरेल. गुळानं हळूहळू एनर्जी मिळते आणि फुटाण्यांनी मसल्स मजबूत होतात.
पचन आणि वजन कंट्रोल राहतं
फायबर हे पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी खूप फायदेशीर असतं. हे चण्यामध्ये भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. तुम्ही ओव्हरईटिंगपासून वाचता आणि त्यामुळे वजन कमी कमी करण्यास मदत मिळते.
महिलांसाठी वरदान
गुळामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान येणारी कमजोरी आणि थकवा दूर करण्यास मदत मिळते. तर चण्यांनी हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत मिळते. शरीरात जर रक्त कमी असेल तर हे कॉम्बिनेशन महिलांसाठी वरदान ठरू शकतं.