Moringa Leaves Benefits: शेवग्याचं झाड आरोग्यासाठी इतकं गुणकारी आहे की, या झाडाच्या शेंगा, पानं आणि फुलांना सुपरफूड मानलं जातं. शेवग्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे आयुर्वेदातही शेवग्याला खूप महत्व आहे. केवळ शेवग्याच्या शेंगाच नाही तर याची पानंही शरीराला मजबूत करतात. जर आहारात याचा समावेश केला तर शरीराला अनेक फायदे मिळतात. अशात जाणून घेऊ शेवग्याचे आरोग्याला होणारे फायदे.
शेवग्याच्या पानांचे फायदे
१) पोषणाचा खजिना
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. या पोषक तत्वांनी शरीराची इम्यूनिटी वाढते आणि कमजोरी दूर होते. खासकरून लहान मुलांसाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते.
२) इम्यूनिटी मजबूत होते
शेवग्यामधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. हे फ्री रॅडिकल्स इम्यून सिस्टम कमजोर करू शकतात. त्यामुळे या पानांमुळे सर्दी, खोकला, इन्फकेशनसोबत अनेक आजारांपासून बचाव होतो.
३) ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल कंट्रोल
शेवग्याच्या पानांमध्ये ब्लड शुगर कंट्रोल करण्याची क्षमता असते. त्यामुळे ही पानं टाइप २ डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर असतात. सोबतच यात बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे गुण असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.
४) पचन तंत्र सुधारतं
शेवग्याच्या पानांमध्ये फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यांच्या मदतीनं पचन तंत्र मजबूत राहतं. अशात बद्धकोष्ठता, गॅस अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते.
५) वजन होईल कमी
शेवग्याच्या पानांमध्ये कॅलरी कमी असतात आणि या पानांमुळे मेटाबॉलिज्मही बूस होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. त्याशिवाय पानांमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात भूकही कंट्रोल होते.
६) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
शेवग्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचेवर ग्लो आणतात आणि सुरकुत्या दूर करतात. त्यासोबतच केसांची वाढही होते.
कसं कराल शेवग्याच्या पानांचं सेवन?
१) शेवग्याची पानं बारीक करून ज्यूस बनवू शकता. हा ज्यूस सकाळी उपाशीपोटी प्यावा.
२) शेवग्याच्या पानांचं तुम्ही सूपही बनवू शकता.
३) शेवग्याची पानं वाळवून त्याचं पावडर तयार करा. हे पावडर तुम्ही स्मूदी, डाळ किंवा गव्हाच्या पीठातही टाकू शकता.
४) शेवग्याची ताजी पानं तुम्ही सलादच्या रूपातही खाऊ शकता.
५) शेवग्याच्या ताज्या पानांचा तुम्ही मोकळी भाजीही बनवू शकता.