तळलेले पदार्थ हे कोणाला आवडत नाही. आपल्या सर्वांना आवडतात. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून तेलकट पदार्थ अधिकवेळा सेवन करणे शरीरासाठी लाभदायक ठरत नाही. तेलकट पदार्थ खाल्ल्याने वजन वाढणे, कॉलेस्ट्रॉल वाढणे, हृदयविकारासंबंधित आजार इत्यादी. अश्या अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. काहीवेळेस जिभेवर ताबा मिळवणे कठीण जाते. आणि त्यावेळेस आपण तेलकट पदार्थ खातो. मात्र, आपण तळण्याची पद्धत बदलून त्यात आरोग्यदायी गुण जोडू शकतो. चला, जाणून घ्या काही स्मार्ट आणि झटपट स्वयंपाक करण्याच्या टिप्स जे तेलकट पदार्थांना देखील आरोग्यदायी बनवू शकतील.
स्वयंपाक तेल बदला
आपल्या शरीरात तेलाचे प्रमाण हे बरोबर गेले पाहिजे. जर तुम्ही तुपात काही तळत असाल तर त्याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचे तेल वापरू शकता. ते जास्त आरोग्यदायी आहे. त्याच वेळी, जेथे तुपाची गरज आहे, तेथे देशी तूप वापरा. प्रमाणात आणि योग्यरीत्या तेल वापरणे महत्त्वाचे आहे.
तळताना गॅस मंद ठेवावे
पुरी किंवा पकोडे/भजी तळायचे असतील तर तेल मध्यम आचेवर तापू द्यावे. यामुळे तेल गडद होत नाही. जास्त उष्णतेवर पोषक द्रव्ये अधिक नष्ट होतात. मंद आचेवर ठेवल्याने पदार्थ तेल जास्त शोषून घेत नाही. त्यामुळे कधीही तळताना गॅस मंद आचेवर ठेवावे.
तळताना पाणी किंवा ओला पदार्थ टाकू नये
जर तुम्हाला काही तलायचे असेल तर, कढईत पाणी किंवा ओला पदार्थ टाकू नये. तेलात पाणी पडल्याने भडका उडतो, आणि हाथ किंवा तोंड जाळण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर जेवणाची चवही खराब होऊ शकते. त्यामुळे तळताना पाण्याचा वापर शक्यतो टाळावा.
खोल कढईचा वापर
जर तुम्हाला कमी तेलात काहीही तळायचे असेल तर त्यासाठी खोल पॅन किंवा मोठी कढईचा वापर करा. यात तुम्ही काहीही सहज तळून घेऊ शकता. यात तेलही कमी प्रमाणात घालावे लागते. आणि अंगावर तेल उडण्याची शक्यता कमी असते. आणि पदार्थ तेल कमी शोषून घेते.