शरीरात ओलावा टिकून ठेवण्यासाठी कलिंगड खाणं आरोग्यासाठी लाभदायक असतं. कलिंगडमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, अ,ब6 आणि क जीवनसत्व असतं. शरीरातील रक्त वाढवण्यास फायदेशीर असलेलं लायकोपिन या घटकाचं प्रमाण कलिंगडमध्ये जास्त असतं. तसेच कलिंगडात सिट्रोलिन नावाचा पोषक घटकही असतो. कलिंगडमधील गुणधर्म कॅन्सरसारख्या घातक आजाराचा धोका कमी करतं. कलिंगडात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण चांगलं असल्यानं शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कलिंगड आरोग्यास लाभदायी असलं तरी ते चिरुन खाताना योग्य पध्दतीनं खाल्लं नाही तर आरोग्यास कलिंगडचे फायदे मिळत तर नाहीच उलट चुकीच्या पध्दतीनं कलिंगड खाल्ल्यानं आरोग्याचं नुकसान मात्र होतं.
Image: Google
कलिंगडामध्ये 92 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळेच कलिंगड खाल्ल्यानं पोटात छान गार गार वाटतं. कलिंगड थंडं करुन खाल्ल्यास आणखी छान गार वाटेल म्हणून अनेकजण् कलिंगड चिरुन फ्रिजमध्ये ठेवतात. डाॅॅ. मीनाक्षी जैन यांच्या मतानुसार कलिंगड खाताना ही चूक अजिबात करु नये. शरीर मन थंडं करणारं कलिंगड फ्रिजमध्ये ठेवून खाल्ल्यास ते आरोग्यासाठी विषारीही ठरु शकतं.
Image: Google
कलिंगड फ्रिजमध्ये का ठेवू नये?
1. डाॅ. मीनाक्षी जैन कलिंगड फ्रिजमध्ये ठेवून का खाऊ नये याबाबत सविस्तर माहिती देतात. कलिंगड चिरुन फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रिजमधील अति थंडं तापमानामुळे कलिंगडातील लायकोपिन, सिट्रोलिन, अ आणि क जीवनसत्वाचं प्रमाण कमी होतं. असं कलिंगड खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही.
2. कलिंगड चिरुन फ्रिजमध्ये ठेवल्यास कलिंगडातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे कलिंगड दूषित होण्याची शक्यता वाढते. फ्रिजमध्ये ठेवलेलं असं दूषित कलिंगड खाल्ल्यानं अन्नाची विषबाधा होण्याचा धोका असतो. डाॅ. मीनाक्षी जैन यांच्या मते कलिंगड चिरल्यानंतर ते ताजं ताजंच खायला हवं.
Image: Google
3. फ्रिजमध्ये ठेवलेलं कापलेलं कलिंगड खाल्ल्यास सर्दी खोकला होण्याची शक्यता असते.
4. फ्रिजमध्ये कलिंगड कापून ठेवल्यास कलिंगडावरील दूषित घटक आतड्यांवर गंभीर परिणाम करतात. दूषित कलिंगड खाल्ल्यानं पचनाच्या आणि पोटाच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.