Join us  

Eid Special: विकेंडला करा पनीर बिर्याणी!! अशी झकास चव की दिल खूश हो जायेगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 6:59 PM

Paneer Biryani Resipe: अगदी हॉटेलसारखी व्हेज पनीर बिर्याणी तुम्ही घरीही करू शकता.. एकदा करून बघा, अशी चव भारी की बाहेर जाऊन बिर्याणी खाणं विसरून जाल..

ठळक मुद्देदिड ते दोन तासांत तुम्ही उत्तम चवीची बिर्याणी करू शकता. त्याचीच ही सोपी रेसिपी. ईदनिमित्त या विकेंडला करूनच टाका हा खुमासदार बेत.

बिर्याणी हा अनेकांचा विकपॉईंट. सगळ्या मसाल्यांचा हलका सुवास देणारी, भातचं प्रत्येक शीत अगदी वेगवेगळं दिसेल अशा पद्धतीने शिजविण्यात आलेली खुमासदार बिर्याणी जेव्हा समोर येते, तेव्हा तिच्या सुवासानेच जणू पोट भरून जातं.. या बिर्याणीवर यथेच्छ ताव मारायला खवय्ये अगदी तयार असतात. अशी चवदार आणि दम लावून शिजविण्यात आलेली बिर्याणी (Paneer Biryani) घरी होऊच शकत नाही, हा अनेकांचा समज आता आपण खोटा ठरवूया आणि ही बिर्याणी रेसिपी (Paneer Biryani Resipe) पाहून अशीच झकास बिर्याणी घरी बनवूया.

 

व्हेज पनीर बिर्याणीची ही रेसिपी यु ट्यूबच्या cookingshooking या पेजवर शेअर करण्यात आली आहे. बिर्याणी बनविण्यासाठी आपल्याला थोडी तयारी निश्चितच करावी लागते. पण बिर्याणी बनवणं हे खूप काही अवघड काम आहे, असं मात्र मुळीच नाही. अगदी दिड ते दोन तासांत तुम्ही उत्तम चवीची बिर्याणी करू शकता. त्याचीच ही सोपी रेसिपी. ईदनिमित्त या विकेंडला करूनच टाका हा खुमासदार बेत.

 

बिर्याणीसाठी लागणारं साहित्य२०० ग्रॅम पनीर, दोन कप बासमती तांदूळ, दोन चमचे दही, कसूरी मेथी, गरम मसाला, लाल मसाला, विलायची, लवंग, तेजपत्ता, दगडफूल, कोथिंबीर, पाव कप काजू, तेल, मीठ, साजूक तूप, आलं- लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो. बिर्याणी रेसिपी- बिर्याणी करण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवा आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.- पनीर मॅरिनेटेड करावं लागेल. त्यासाठी पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करा. एका बाऊलमध्ये टाका. त्यात दही, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, कसूरी मेथी, मिरेपूड असं सगळं टाका. त्यात पनीर टाका. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यावर झाकण ठेवून अर्धा तास मॅरिनेटेड करायला ठेवून द्या. 

- तांदूळ अर्धा तास भिजवून झाले की एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्या पाण्यात मीठ आणि तेल टाका. पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेले तांदूळ टाका. या पाण्यात तांदूळ केवळ ७५ टक्केच शिजवून घ्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या. अर्धवट शिजलेला भात थोडा थंड होऊ द्या.- आता कुकर गॅसवर ठेवा. त्यात २ चमचे साजूक तूप आणि १ चमचा तेल टाका. - तेल तापलं की दोन- तीन विलायची, चार ते पाच लवंगा, एक दोन काळे मिरे, तेजपान, दगडफूल टाका आणि परतून घ्या. - त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्या. कांदा परतल्यानंतर आलं- लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून परता.

- टोमॅटो परतला की त्यात लाल तिखट, गरम मसाला, मिरेपूड, कसूरी मैथी, बिर्याणी मसाला टाका. हा सगळा मसाला बुडेल एवढं पाणी त्यात टाका.- आता आपण बिर्याणीचे थर लावणार आहोत. या पाण्यावर आता आपण शिजवलेल्या भाताचा एक थर द्या.- त्यावर मॅरिनेटेड पनीरचा एक थर लावा. पुन्हा वरून भाताचा एक लेयर लावा. सगळ्यात वर कोथिंबीर, काजू आणि केशर टाका. थोडसं तूप वरतून पुन्हा टाका आणि तांदूळ ज्या पाण्यात शिजवलं ते अर्धा कप पाणी वरून टाका.- कुकरची शिट्टी काढा आणि झाकण लावून १० मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. त्यानंतर तवा ठेवा आणि तव्यावर कुकर ठेवा. यावेळी गॅस मोठा ठेवून १५ मिनिटे शिजवा. गरमागरम बिर्याणी झाली तयार. गॅस बंद केल्यावर बिर्याणी काही मिनिटे तशीच ठेवून सेट होऊ द्या आणि नंतर कांदा रायत्यासोबत सर्व्ह करा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीईद ए मिलादकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.